Press "Enter" to skip to content

कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम जासई हायस्कूलमध्ये संपन्न


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती विद्यालयात शासनाचे नियम पाळून व सोशल डिस्टसिंगचे पालन करून जासई हायस्कूलमध्ये साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन अरुणशेठ जगे, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कामगार नेते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य सुरेश पाटील, माजी सभापती नरेशशेठ घरत, गाव अध्यक्ष यशवंत घरत, गोपीनाथ म्हात्रे, उपमुख्याध्यापक खाडेसर, संघटनेचे अध्यक्ष नूरा शेखसर सर्व सेवक वर्ग उपस्थित होता.

ऑनलाईन कर्मवीर जयंती निमित्त विद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामधील पहीले तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पेन व गुलाब पुष्प देउन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेमार्फत घेण्यात आलेली ऑनलाईन चाचणीसाठी ज्या वर्गाची शंभर टक्के उपस्थिती होती अशा वर्गशिक्षकांचा सत्कार करण्यात आला .

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. गोरगरीब जनतेच्या झोपडीपर्यत ही ज्ञानगंगा वाहून नेणारे थोर शिक्षण महर्षि यांच्या विषयी माहिती सांगितली, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग यांनी कर्मवीरांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती हे कर्मवीरांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, स्वतः साठी कोणतीही संपत्ती जमा न करता उलट स्वतःची जमीन दागिने संस्थेच्या कामासाठी अर्पण केले हे विचार मांडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.