Press "Enter" to skip to content

उरण एस टी आगारात डोंगराएवढ्या समस्या

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी दिले निवेदन 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 🔶🔷🔶🔷

उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उरण आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांचे सोबत उरण पंचायत समिती कार्यालयात आगारातील समस्या बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या मीटिंग साठी उरण चे सभापती ऍड सागर कडू उपसभापती शुभांगी सुरेश पाटील महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत शहर पदाधिकारी नारायण पाटील उपस्थित होते.

उरण शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शहर चिटणीस शेखर पाटील यांनी पक्षाच्या वतीने डेपो मॅनेजर सतीश मालचे याना निवेदन सादर केले यावेळी कोरोना काळात एस टी सेवा मर्यादित स्वरूपात सुरू असल्याबद्दल डेपो मॅनेजर सतीश मालचे याना धन्यवाद देण्यात आले.

उरण आगरातून पूर्वीच्या प्रमाणे बस सुरू करणार असल्याचे डेपो मॅनेजर यांनीमान्य केले पनवेल दादर बेलापूर ठाणे पेण व उरण तालुक्यातील ग्रामीण भागात एस टी ची सेवा पुर्व वत करावी यामुळे कामगार व प्रवाशी यांच्या समस्या दूर होतील करंजा ते मोरा अशी मिनी बस सेवा सुरू करावी याचा लाभ सामान्य प्रवासी याना होईल एस टी आगारातील असुविधा याकडे लक्ष वेधले यामध्ये बाथरूम अस्वछता पिण्याचे पाणी पुरेशी लाइट नादुरुस्त पंखे या समस्या दूर करण्याचे सांगितले.

उरणचे सभापती ऍड सागर कडू यांनी आगाराचे इन गेट सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत यामुळे इन व आऊट गेट मुळे चारफाटा येथील वाहतूक कोंडी ला आळा बसेल त्याबद्दल आगार प्रमुख यांनी सभापती यांचे आभार मानले आगारात सुलभ शौचालय , कॅन्टीन ,पे आणि पार्किंग सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आगारात देखभाल करण्यासाठी वाचमन नियुक्ती करण्यात यावी या सर्व समस्या बाबत उरण डेपो मॅनेजर यांनी सकारात्मक पावले उचलण्याचे मान्य केले.

यावेळी स्थानक प्रमुख शांताराम म्हात्रे व शेकाप पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.