सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील ) 🔶🔷🔷🔶
बिगेंन अंगेंन कार्यक्रमा अंतर्गत राज्यात एस टी बस सेवा पुर्ण क्षमतेने चालविण्यास सुरुवात झाली आहे मात्र या एस टी बस मधून अधिस्वीकृती धारक पत्रकारांचा प्रवास मात्र लटकला आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पत्रकारांच्या अधिस्वीकृती पत्रिकेला 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिलेली असली तरीही याबाबतच्या कोणत्याही सूचना राज्य परिवहन विभागाला दिल्याचं नसल्याने एस टी ने प्रवास करू पाहणाऱ्या अधिस्वीकृती धारक पत्रकारांना ही सध्या प्रवासाचे तिकीट फाडून आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे .
खिशात असलेली अधिस्वीकृती पत्रिका मुदतवाढीीमुळे अधिकृत असली तरी ही एस टी बसची राज्य शासनाकडून देण्यात आलेली स्मार्ट कार्डे आता मुदत बाह्य झाली असल्याने बसचा वाहक आणि पत्रकारांमध्ये हुज्जत घडण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अधिस्वीकृती पत्रिकांना दर महिन्यात मुदतवाढ दिली जात आहे मात्र त्याचा कोणताही लेखा जोखा परिवहन विभागाला कळवलाच जात नाही त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्येच समन्वयाचा मोठा आभाव असल्याची बाब या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.
आधीच कोरोनामुळे अनेक पत्रकारांना घरी बसावे लागलेले आहे. अनेकांना रोजगार टिकेल की नाही याची शाश्वती नाही आणि सरकारी पातळीवर समन्वय नसल्याने आता अधिस्वीकृती पत्रिका खिशात असतानाही पत्रकारांना मोफत प्रवासाचा पास नूतनीकरण नसल्याने नाहक प्रवासाचे तिकीट फाडावे लागत असल्याने लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात नाराजी व्यक्त केली जात आहे.







Be First to Comment