Press "Enter" to skip to content

माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणातून प्राथमिक शिक्षकांना वगळा…

रोहा तालुका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी 🔶🔷🔷🔶

शिक्षकांनी दिले गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔷🔷🔶🔶


मार्च पासून कोरोना ने सर्वत्र थैमान घातल्यानंतर शासनाने अनेक कर्मचाऱ्यांना कोरनाची साखळी तोडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक केली. यात प्राथमिक शिक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र त्यांना अद्यापही कोणत्याही प्रकारचे सुरक्षा कवच दिले नाही. तरी सुद्धा त्यांनी आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडली.

या मध्ये अनेक शिक्षकांना आपला प्राण गमवावा लागला. आता पुन्हा शिक्षकांना या कामात गुंतविण्यात येणार असून याबाबत रोहा तालुका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने गटविकास, अधिकारी गट शिक्षण अधिकारी रोहा यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझे कुटुंब माझी जबाबदारीचे सर्वेक्षण आरोग्य विभाग व गावातील स्वयंसेवक यांनी करावा असा आदेश असताना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील या सर्वेक्षणा करिता रायगड जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांना सहभागी करण्यात येणार असल्याचे समजते. यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांनी कोविड-19 संबंधी चेकपोस्ट, स्टेशन दुकान, नोडत अधिकारी तसेच गाव स्तरीय कोविड नियंत्रक कक्ष पथक सर्वेक्षण अशी कामे करून यापूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन म्हणून आपले कर्तव्य बजावले.

तथापि कोविड-19 आजार संबंधीच्या कामासाठी प्राथमिक शिक्षकांना नेमू नये असे असेल तर कार्यमुक्त करावे असे वरील संबधी पत्रान्वये शिक्षक संचालक महाराष्ट्र राज्य पुणे व उपसचिव शालेय विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश आहेत. तरी रोहा तालुका सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आपणास विनंती आहे की शासनाच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांना संबंधित कोणत्याही सर्वेक्षणासाठी नेमण्यात येऊ नये.

नेमले असतील तर कार्यमुक्त करण्या विषयी आपल्या स्तरावरून आदेश व्हावे हे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष श्री नारायण रामचंद्र गायकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद अध्यक्ष श्री खेमसिंग हिराचंद चव्हाण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष श्री देवानंद गणपत पिंगळे, पदवीधर, व केंद्रप्रमुख संघटना अध्यक्ष श्री रत्नाकर महादेव कनोजे, पदवीधर शिक्षक संघटना अध्यक्ष श्री मिलिंद दत्तात्रेय कासारे आदींनी निवेदन गट विकास अधिकारी रोहा, गट शिक्षण अधिकारी रोहा यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.