Press "Enter" to skip to content

मनसे उलवेची भरारी.. शेकडो नागरिकांचा पक्ष प्रवेश

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे ) 🔷🔶🔷🔶


मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे, रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवे नोड मधील शेकडो नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

उलवे नोड येथील नागरिकांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास दाखवत शेकडोंच्या संख्येने मनसेत प्रवेश केला. सत्ताधारी सध्या वेगळ्याच गोष्टींमध्ये आपला वेळ घालवीत आहेत म्हणुन आपल्या प्रमुख समस्यांचे उत्तर कुठे मिळेल तर उत्तर एकमेव आहे ते म्हणजे कृष्णकुंज हिच भावना पक्ष प्रवेश करणाऱ्या तरुणांनी बोलुन दाखवली.

या कार्यक्रमास यतीन देशमुख (अध्यक्ष – मनसे कर्मचारी सेना प.म.पा), निर्दोष गोंधळी (उपाध्यक्ष – मनसे पनवेल), राहुल पाटील (अध्यक्ष – उलवे शहर), उलवे शहर उपाध्यक्ष श्रीमत घरत, आकाश देशमुख, अनिकेत ठाकुर (सरचिटणीस – उलवे शहर), कु.अमित पाटील (अध्यक्ष – वाहतूक सेना उलवे शहर), कु.प्रितम तांडेल (उपाध्यक्ष – गव्हाण प.स), मनोज कोळी, तुषार म्हात्रे, अशोक वडांगळे आणि मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कोरोना काळात मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रभर आपली जनसेवा चालु ठेवली. उलवे शहरात रोजच्या रोज लाखाहून अधिक हॉस्पिटलची बिले स्थानिक कार्यकर्ते रुग्णांना कमी करून देत आहेत. झपाट्याने होत चाललेले खाजगीकरण, वाढती महागाई, बेरोजगारी, घसरलेली GDP, रोगराई यांकडून लक्ष हटविण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे स्टंट चालु आहेत ते त्यांनी चालवावे. याकाळात मनसे आपली जनसेवा थांबवणार नसुन आम्ही अधिक वेगाने काम करीत राहू.
संदिप देशपांडे - रचिटणीस मनसे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.