Press "Enter" to skip to content

कर्जत मधील कोव्हीड योद्धा राजेश ओसवाल


सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷


कर्जत शहरतील पारस एन एक्स स्टोअर्सचे संचालक राजेश ओसवाल यांनी आसपासच्या परिसरातील 200 रुग्णांना या आपत्कालीन परिस्थिती मध्ये बेड मिळवून देण्याचे कार्य केले आहे. अश्या कोव्हीड योध्याला कर्जतकरांचा सलाम आहे.

सानपाडा येथील एमपीसिटी हॉस्पिटल आणि सेठीया हॉस्पिटल येथे पुढाऱ्यांनी राजेश ओसवाल यांच्याच माध्यमातून बेड मिळवून दिले आहेत. त्यामुळे क्रिटिकल पेशन्ट देखील वाचले आहेत. ज्यावेळी बेडबाबत अडचण येते तेव्हा अनेकांनी राजेश ओसवाल यांनाच संपर्क साधला आहे. अशाही व्यक्ती असतात ज्यांना प्रसिद्धी व राजकरण या गोष्टीपासून कायम दूर रहायला आवडते.

कोव्हीड-19 काळात पैसे असूनही उपचार- बेड अभावी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये राजेश ओसवाल यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.