जयेश संभाजी पाटील भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव / पातळगंगा : 🔶🔷🔷🔶
भारतीय जनता पार्टी यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी निवडुकीच्या वेळी काही महिने अगोदर ग्रामीण भागातील तरुण तडफदारांच्या खांद्यावर तालुक्यातील जबाबदारी सोपविण्यात आली होती. तालुक्यातील युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी जयेश पाटील यांनी स्वीकारून पक्ष वाढविण्याच्या समवेत चांगली कामे केली होती.
उरण मतदार संघातील आमदार महेश बालदि यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या परिसरातील तरुण वर्गांनी पक्ष प्रवेश करुन जबाबदारी देण्यात आली होती.मात्र मराठा आरक्षण मिळत नाहि.तो पर्यंत तालुका उपाध्यक्ष पदाचा कार्यकाळ सांभाळणार नाही. शिवाय या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
जयेश संभाजी पाटील यांना महेश बालदी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ रोजी नियुक्ती पत्र देण्यात आले.
शिवाय यांचे काम उत्तम प्रकारे चालेले होते.त्याच समवेत हा पक्ष वाढविण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.मात्र मराठा आरक्षण संदर्भात अनेक राजकीय पक्ष हवे तेवढ्या प्रमाणात सहकार्य करीत नसल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणा वरती गेले अनेक वर्ष निर्णय लागत नाही.महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण उगाच राजकीय पद घेऊन काय करायचे ? असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यामुळे मी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मराठा सामाज्याला आरक्षण नसल्यामुळे विविध शासकीय नोकरीमध्ये मोठ्या प्रमाणात सामाविले जात नाही.यामुळे अनेक सुशिक्षित तरुण वर्ग बेरोजगार झाले आहेत.मात्र आरक्षण मिळाल्यास त्यांना नोकरी मिळू शकते.जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही.तो पर्यंत आपण कोणत्याही राजकीय पदावर काम करणार नसल्याचे जयेश पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलतानां सांगितले.







Be First to Comment