
डॉ गिरीश गुणे, सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांचा पुढाकार
सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔶🔷🔶🔷
कोरोना ( कोविड १९ ) ह्या भयानक महामारीच्या काळात अनेकांचे रोजी रोजगार बंद झाले अश्यातच आदिवासी बांधवांचे ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांच तर जगणं मुश्किल झालं आहे…आणि ह्याच आदिवासी बांधवांसाठी आणि गरीब गरजूवंत रुग्णांसाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे आदिवासी मित्र राजू मुंबईकर आणि गरीब -गरजूवंत रुग्णांसाठी साक्षात देवदूत सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ. गिरीश गुणे यांच्या औदार्यांने रानसई येथे खैरकाठी आणि खोंड्याची वाडी ह्या आदिवासी वाड्यांवर आदिवासी बांधवांना सॅनिटायजर आणि मास्कचं वाटप करण्यात आले.

ज्यांनी हे सॅनिटायाजर आणि मास्क आदिवासी बांधवांना देण्याचं औदार्य दाखवलं असे संवेदनशीलता, प्रामाणिकपणा,नम्रता सर्वसामान्य लोकांशी असलेली आस्था आणि सामाजिक जाणीव अशी ज्यांची अनेक गुण-वैशिष्ट्ये आहेत ते ज्यांनी आज ही स्वतःच हॉस्पिटल सांभाळत महापालिकेला सहकार्य करणारे एकमेव डॉक्टर शिवाय ह्या कठीण प्रसंगीसुद्धा अनेक रुग्णाची ओ.पी.डी.आणि शस्त्रक्रिया करण्यात आज पण ते कोणतीही कसूर न करता अश्या संकट समयी सुद्धा सेवा हीच पूजा समजून वडिलांनी सेवाव्रताच्या दिलेल्या दीक्षेची पावित्रता जपत आपल्या गुणे हॉस्पिटल नावाच्या देवालयातून रुग्णांना अविरत सेवा देणारे गुण आणि गुणे हे समीकरण कायम ठेवला, समाजसेवा आणि रुग्णसेवेला नवे आयाम देणारे रोटरीयन डीस्ट्रीक गव्हर्नर ( प्रांतपाल )३१३१ डॉ.गिरीश गुणे आणि सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांच्या औदार्याने, सहकार्याने आदिवासी बांधवांचं कोरोना महामारी पासून संरक्षण व्हावे ह्या उदात्त हेतूने हा सुंदर आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ह्या कार्यक्रमास रानसई ग्रा.प.सदस्य श्याम लेंडे, सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, संपेश पाटील, मंगेश पाटील पिरकोन गावचे सहकारी समाधान पाटील, अनिल घरत आणि सर्व आदिवासी बांधव यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संप्पन झाला.








Be First to Comment