Press "Enter" to skip to content

२ ऑक्टोबर रोजी आगरदांडा बंदरात सागरी आंदोलन छेडणार !

संजय यादवराव यांची घोषणा 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / मुरूड : अमूलकुमार जैन 🔷🔷🔶🔶


कोकणातील मच्छिमारांना हक्काची जेट्टी मत्स्यविभागाने उपलब्ध करून दिलेली नाही.संपूर्ण कोकणात हर्णे बंदर व दाभोळ ची जेट्टी आहे.त्यामुळे मच्छिमारांनी पकडलेली मासळी मुंबईला विकण्यासाठी खूप मोठा इंधन खर्च होत आहे.यासाठी मुंबई पासून जवळ असणारी आगरदांडा जेट्टी हि खूपच सोईस्कर असून स्थानिक मच्छिमारांना होड्या थांबवणे व मासे विक्रीसाठी कायमस्वरूपी स्थान देण्यात यावे.व कोकणातील पर्यटनाला चालना मिळवून देण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती पासून सर्व सामाजिक संस्था व सर्व मच्छिमार संस्था एकत्र येऊन एक मोठे सागरी आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे प्रतिपादन कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

जय भवानी मच्छिमार संस्थेत एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.यावेळी जय भवानी मच्छिमार संस्थेचे चेअरमन महेंद्र गार्डी,मुरुड तालुका नाखवा संघाचे समन्वयक प्रकाश सरपाटील,दीपक परब,प्रवीण मुळीक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी संजय यादवराव म्हणाले कि, संपूर्ण कोकणात ४ लाख टन मासेविक्री होते.मासे विक्री पासून १५ हजार कोटीची अर्थ व्यवस्था टिकून आहे.देशाला परकीय चलन सर्वाधिक मासे विक्री पासून मिळत आहे.देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम मच्छिमार करीत आहेत.परंतु खेदाने नमूद करावेसे वाटते कि मत्स्यविभागाने कोकणातील मच्छिमारांसाठी हक्काची व सर्व सुविधा प्राप्त असलेली जेट्टी अद्यापर्यंत बांधलेली नाही.त्यामुळे येथील मच्छिमारांचा विकास पाहिजे तसा होऊ शकलेला नाही.

टोकेखार येथील नवीन जेट्टी च्या कामास सुरुवात होत आहे हि बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. टोकेखार ची जेट्टी पूर्ण होई पर्यंत आगरदांडा जेट्टीवर स्थानिक मच्छिमारांना होडी थांबवणे व मासळी विक्रीची कायम स्वरूपी परवानगी दिली पाहिजे येथे कोणताही कालावधी असता कामा नये एकतर संचार बंदी मुळे व विविध येणाऱ्या निसर्ग वादळामुळे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीस आलेला आहे.तो कर्जबाजारी झालेला आहे त्यांना उभे राहण्याची संधी दिली पाहिजे यासाठीच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सागरी आंदोलनाचा पवित्रा घेत असल्याचे प्रतिपादन संजय यादवराव यांनी केले आहे.

संपूर्ण कोकणात चार बंदरे असून तिथे सुद्धा कोणतीही सुविधा नाही.कोकणातील मुख्य आकर्षण पर्यटन ,मासळी,व आंबा आहे.त्यामुळे मासळी हे पर्यटकांचे आकर्षण आहे.स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न असल्याने आगरदांडा येथे मच्छिमारांना बोट थांबवणे व मासळी विक्री साठी परवानगी मिळालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे समन्व्यक प्रकाश सरपाटील मत्स्य विभागाने जेट्ट्या या दुर्गम भागात बांधल्या आहेत.

आगरदांडा येथे आता परराज्यातून मासे खरेदी करण्यासाठी खरेदीदार येत आहेत.येथे आता मोठा व्यवसाय वृद्धीगंत होत असून सदरची जागा मच्छिमारांना योग्य असल्याचे प्रतिपादन सरपाटील यांनी केले आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.