जिव्हाळा फाऊंडेशन आणि उरण सामाजिक संस्थेचा उपक्रम 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण : विठ्ठल ममताबादे 🔶🔶🔷🔷
जिव्हाळा फाऊंडेशन आणि उरण सामाजिक संस्था यांच्या वतीने , कोप्रोंली आदिवासी वाडीवर आदिवासी समाजात कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात आली.
रानसई खैरकाठी येथील एक युवक विजय अरुण शिंगवा (वय-21) याचे कोरोनाने निधन झालं असल्याची माहिती उरण मधील सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी यांचेकडून रुपेश पाटील व त्यांच्या सहकार्यांना मिळाली. त्यानंतर विविध ग्रुपवर चर्चा सुरू झाली. खरंतर कोरोना काळात विविध कारणाने वाड्यावर रुपेश पाटील यांची येजा सुरूच असते. मात्र विजयच्या निधनाने या वाडी वस्त्यांवर जाऊन त्यांची भीती घालवणे अतिशय गरजेचे होते.

त्यामुळे “शुभस्य शीघ्रम” या उक्तीप्रमाणे तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाडी वस्त्यांवर प्रत्यक्ष जाऊन तिथल्या आदिवासी जनतेचे प्रबोधन करण्याबाबत रुपेश पाटील यांनी मेसेज टाकला होता. संस्थेच्या सदस्यांनी त्यास प्रतिसाद दिला. काहींनी यायला जमणार नसल्याचे कळवले होते. काहींनी उद्या परवा येण्याचे कळवले मात्र लगेचच पंकज ठाकूर, रुपेश पाटील असे दोघे त्यानंतर कोप्रोलीचे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, राजेश पाटील, गजानन पाटील, गिरीश पाटील यांच्यासह आदी मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते वाडीवर पोहोचले . तिथल्या आदिवासींबरोबर चर्चा केली, संवाद केला.

यावेळी तिथल्या ग्रामपंचायत सदस्या बेबीबाई कातकरी उपस्थित होत्या. जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष तसेच उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष रुपेश पाटील, उरण सामाजिक संस्था सदस्य तथा पत्रकार पंकज ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी वाडीवरील आदिवासीना कोरोना आजार, त्याच्यावरील उपाययोजना , घ्यावयाची खबरदारी , याबद्दल माहिती दिली. तसेच कोरोना आजाराला न घाबरता त्यावर उपचार केल्यास माणूस बरा होतो असा विश्वास देण्यात आला.
वाडीवरील मुलांना खाऊ वाटप करून सर्वांना निरोप देण्यात आला. जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष रुपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकूर यांनी यावेळी विशेष मेहनत घेतली.







Be First to Comment