Press "Enter" to skip to content

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण’ कामावर गुरूजींचा बहिष्कार


सिटी बेल लाइव्ह /खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔶🔷

शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी अंतर्गत घरोघरी जावून तपासणीला शिक्षक संघटनानी विरोध दर्शविला असून कोणीहि शिक्षकानी सहभागी होवू नये असे आवाहन संघटनानी केल आहे.

तालुक्यात दररोज पन्नास कुटूंबाची तपासणी साठी पथक तयार करण्यात आली आहेत.यामध्ये अंगणवाङी सेविका,आशा सेविका आणि शिक्षकांचा समावेश आहे.खालापूर तालुक्यात साङेचारशे प्राथमिक शिक्षक आहेत.परंतु शिक्षकानी नकार दिल्याने प्रशासनाची ङोकेदुखी वाढली आहे.शिक्षकानी कोरोना काळात विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी पार पाडल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील कक्ष , टोल नाक्यावरील ड्युटी, परराज्यातील कामगार वाहतूक ,सर्वेक्षण आदि. वेगवेगळी कामे केली. हे काम करत असताना प्राथमिक शिक्षकांना विमा कवच द्यावे अशी मागणी शासनाकडे वारंवार शिक्षक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र अद्यापही यावर शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने मोठी नाराजी आहे.

या प्रक्रियेत सहभागी सर्व कर्मचारी संवर्गाना विमा कवच असताना शिक्षकाना विमा कवच शासनाने दिलेले नाही. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी” कार्यक्रमाच्या शासन स्तरावरील पत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे प्राथमिक शिक्षकांचा उल्लेख नाही.
तरी या बाबत रायगड जिल्ह्यातील तमाम प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने माननीय शिक्षण सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंगळवारी
संयुक्त निवेदन देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष उमेश विचारे यानी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.