सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔷🔶🔶
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने समाजाची पुढील वाटचाल व दिशा काय असावी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पेण तालुका मराठा महासंघाची सभा नुकतीच संपन्न झाली.
सदर सभेमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारी नोकरी भरती करू नये शिक्षणात विद्यार्थ्यांना ॲडमिशन व सवलत मिळावी या प्रमुख मागण्यांवर चर्चा झाली तसे लेखी निवेदन तहसीलदार , प्रांताधिकारी व पोलिस ठाणे येथे देण्यात येईल असे ठरले.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ पेण तालुका अध्यक्ष रुपेश कदम, सुनील(आप्पा) सत्वे ,अविनाश पाटील (निधवली), अखिल भारतीय मराठा महासंघ नाणेगावचे अध्यक्ष माधव नाईक , मराठा समाज ग्रामीण विभागातील सल्लागार प्रतिनिधी अशोक पाटील(बोरगाव), सुभाष टेंबे (आंबेघर),विष्णू कदम (गणपती वाडी),दिनेश खामकर(धावटे) पत्रकार नरेश पवार यासह पेण शहर पदाधिकारी
अनंत सावंत,अनिल देशमुख,प्रशांत सावंत आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.







Be First to Comment