Press "Enter" to skip to content

ग्रुप ग्रामपंचायत केगावला ६ इंची व्यासाचा पाईन लाईनसाठी साकडे


माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची मंत्री महोदयांकडे मागणी 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷

ग्रुप ग्रामपंचायत केगाव येथे पाण्याचा मोठा प्रश्न अनेक कित्येक वर्षे भेडसावत आहे. ग्रामपंचायतची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा टँकर सिडकोमार्फ़त सुरू केले होते त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना पाणी प्रश्न कमी झाला होता. परंतु ग्रामपंचायत लोकसंख्या जास्त असल्याने सदर प्रश्न निर्माण होत आहे.

सदर ग्रामपंचायतीनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार त्यांचा पाण्याचा प्रश्न कायम सोडविण्यासाठी आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी त्यांनी ग्रुपग्रामपंचायत केगाव करिता ६ इंच व्यासाचा वाढीव नळ कनेक्शन मिळावा, जेणेकरून पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेवुन सदर विषयाचे सविस्तर निवेदन देवून चर्चा केली.

यावेळी मंत्रीमहोदयानी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.