Press "Enter" to skip to content

पेण नगरपालीकेच्या विकास कामाला विरोध कशाला – आमदार रवीशेठ पाटील 

आमदार रवीशेठ पाटील व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पेण (प्रशांत पोतदार) 🔶🔶🔷🔷

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे याच प्रमाणे पेण नगरपालिके तर्फे विकास कामे करण्यात येत आहेत.रायगड जिल्ह्यात पेण नगरपालिका विकास कामात पहिल्या नंबरवर आहे यामुळे विकास कामांना विरोध न करता सर्वांनी विकास कामासाठी एकत्र या असे आवाहन पेण मतदार संघाचे आमदार रवीशेठ पाटील यांनी पेण विश्वेश्वर नगर येथील डम्पिंग ग्राउंड येथे होत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन  कार्यक्रमाप्रसंगी केले.

पेण येथे हायवा कंपनी, एस जी एस कंपनी ,पेण नगरपालिका त्यांच्या विद्यामाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार रवी शेठ पाटील व जिल्हाधिकारी निधी चौधरी त्यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पेण नगरपालिका करत असलेल्या कामाचे कौतुक केले तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे येथील प्रदूषण कमी होऊन ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे तसेच नागरिकांनाही आनंद देणारा हा प्रकल्प असल्याचे सांगितले.

आज क वर्गातील नगरपालिका सी एस आर फंड देवुन हायवा कंपनी कडून हा महत्वाचा प्रकल्प पेण येथे राबवण्यात येत आहे तर पनवेल महानगरपालिके प्रमाणे पेण नगरपालिका काही वर्षात महानगरपालिका होईल असे सांगितले.

याप्रसंगी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील, प्रांत विठ्ठल इनामदार, मुख्याधिकारी अर्चना दिवे ,गटनेते अनिरुद्ध पाटील ,नायब तहसीलदार धनंजय कांबळे ,एस एस प्रायव्हेट कंपनीचे मोहन घाडगे हायवा कंपनीचे सुरेश दाभेकर, मिलिंद मात्रे ,नगरसेविका तेजस्वि नीने, वसुधा पाटील नगरसेवक दिपक गुरव,निवृत्ती पाटील, शोमेर पेणकर, दर्शन बाफना,राजू वारकर,संतोष पाटील,भास्कर पाटील,शिवाजी चव्हाण,अंकिता ईचक आदी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.