◆ चित्रलेखाताई पाटील यांच्याकडून विशेष कौतूक 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔶🔶🔷🔷
रोहे तालुक्यातील शेडसई ग्रा.पं.हद्दीतील आदिवासी समाजबांधव आणि अन्य गरजू नागरिकांना शेकाप कार्यकर्ते यांच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.
शेकापक्षाने आपली वचनपूर्ती पुर्ण करीत व जनसेवा हीच ईश्वर सेवा मानत सदर अन्यधान्य किटचे वाटप करण्यात आले आहे.शेडसई ग्रा. पं.हद्दीतील शेकापच्या तरुण कार्यकर्ते मंडळींने केलेल्या या कार्याचे कौतूक करताना शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांनी समाधान व्यक्त करीत कार्यकर्ते मडळींना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत. तर शेकाप कालही मदत करत होता.आजही केली आणि भविष्यातसुध्दा करणार असल्याचे व आपल्या माणसांसाठी शेकाप कटीबध्द राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
शेडसई ग्रामपंचायत हद्दीतील शेकाप कार्यकर्ते मंडळींनी गोफण,भगिर्थीखार, लक्ष्मीखार,आदीवाशी वाडी आणि इतर गावांना अन्रधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी गोफण गाव अध्यक्ष तुकाराम बामुगडे,ग्रामपंचायत सदस्य बाळू ग. कडू,ग्रामापंचायत सदस्या आर्या अमोल शिंगरे,जिल्हा क्रीडा सेल सदस्य शशिकांत कडू,मनोज जाधव,मंगेश कडू,विलास शिंगरे,चंद्रकांत कडू,लक्ष्मीखार ग्रामस्थ घाणेकर भाऊ,शेडसई युवक ज्ञानेश्वर पाष्टे,भोपी आदी उपस्थित होते.







Be First to Comment