Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषद इमारतीत “पत्रकार कक्ष” मिळण्याची पत्रकारांची मागणी !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे 🔷🔶🔷🔶

शहरात किंवा ग्रामीण भागातून बातमी कव्हरेज करून आल्यावर क्षणभर विश्रांती घेऊन बातमी लिहून योग्य स्थळी पाठविण्यासाठी पत्रकारांना हक्काची केबीन कर्जतमध्ये नसल्यामुळे आज पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी व मुख्याधिकारी डॉ . पंकज पवार – पाटील यांना निवेदन देऊन पालिकेच्या इमारतीत पत्रकार कक्ष केबीन मिळावी अशी मागणी केली .

शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील पत्रकारांना बातमी संकलित करण्यासाठी हक्काची ” पत्रकार कक्ष ” केबीन ची जागा पालिकेच्या इमारतीत आरक्षित असते , मात्र आजपर्यंत अशी केबीन पत्रकारांना मिळाली नाही , त्यामुळे या धावपळीच्या युगात शहरातून तसेच ग्रामीण भागातून बातमी संकलित करुन आल्यावर क्षणभर विश्रांतीसाठी पत्रकार कक्ष केबीन नसल्याने पत्रकारांची खूपच अडचण होत होती . म्हणूनच कर्जतमधील सर्व पत्रकार संघटनेच्या पत्रकारांनी आज कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी व मुख्याधिकारी डॉ . पंकज पवार – पाटील यांना निवेदन देऊन कर्जत नगर परिषद कार्यालयाच्या इमारतीत पत्रकार कक्ष केबीनची मागणी केली .

पत्रकार कक्ष मिळण्यासाठी हे निवेदन संबंधित कार्यालयाकडे पाठवून सर्वतोपरी मदत व प्रयत्न करू , असे आश्वासन नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांनी दिले .

यावेळी निवेदन देताना कर्जत प्रेस क्लबचे सदस्य तथा माजी तालुका सचिव पत्रकार सुभाष सोनावणे , पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा संघटक जगदीश दगडे , पत्रकार सुरक्षा समितीचे कर्जत तालुका कार्याध्यक्ष प्रशांत खराडे , पत्रकार उत्कर्ष समितीचे सदस्य प्रथमेश कुडेकर आदी पत्रकार उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.