Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी स्पोर्टला मैदानासाठी भूखंड मिळण्यासाठी पालकमंत्र्याना साकडे


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔷🔶

उरणकर खेळाच्या मैदानापासून आजतागायत वंचीत आहेत. सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशनला भूखंड द्यावा असे साकडे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व असोसिएशनचे सर्वेसर्वा महादेव घरत यांनी घातले आहे.

सिडकोने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी करूनही इतर सुविधासह उरणकरांसाठी साधे खेळण्याचे मैदानही देऊ शकले नाहीत. यामुळे खेळाडू अनेक क्षेत्रात चमकण्यापासून वंचित राहिले आहेत. महादेव घरत यांनी ही अडचण लक्षात घेत उरणमधील खेळाडूंना संधी मिळावी म्हणून द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना करून दरवर्षी मोठ्या थाटामाटात उत्सव साजरा करीत आहेत.

या महोत्सवातून अनेक खेळाडू राज्य व जिल्हास्तरावर चमकले आहेत.
उरणमध्ये अनेक चमकते सितारे असे खेळाडू आहेत. परंतु त्यांना सराव करण्यासाठी मैदानाची मोठी अडचण आहे. ती दूर करून गेली अनेकवर्षे मैदानापासून वंचित असलेल्या उरणकरांसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनला सिडकोकडून भूखंड मिळावा यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर व द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्वेसर्वा महादेव घरत यांनी साकडे घातले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.