Press "Enter" to skip to content

खोपटे येथे सेवा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔶🔷


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून सेवा सप्ताह कार्यक्रम राबविन्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल चे आमदार तथा जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, उरण च्या नगराध्यक्षा सायलीताई म्हात्रे,महिला आघाडी तालुका अध्यक्षा राणी ताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी खोपटे व महिला आघाडी, खोपटे-उरण यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आयोजन करण्यात आले.तसेच प्लास्टिक निर्मूलन जनजागृती साठी गावात कापडी पिशव्यांचे वाटप करून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये ह्या संदर्भात जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यक्रमासाठी खोपटे गावचे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, प्रदीप गणपत ठाकूर (भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी),प्रशांत रमेश ठाकूर(चिरनेर पंचायत गण अध्यक्ष),सुगंघा कोळी (महिला विभाग अध्यक्षा),अचुत ठाकूर (ग्रामपंचायत सदस्य), कलावती घरत( म.आ.गाव अध्यक्षा), देवानंद पाटील(ग्रामपंचायत सदस्य), संदेश म्हात्रे (ग्रामपंचायत सदस्य), तसेच गावातील महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.