Press "Enter" to skip to content

कमोठ्यातील सोसायटीचा आदर्श वस्तुपाठ

सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना केली भरघोस आर्थिक मदत 🔶🔷🔶🔷

कोरोना मुळे झाला होता सुरक्षारक्षकाचा मृत्यू 🔷🔷🔶🔶

सिटी बेल लाईव्ह/ कामोठे :🔶🔷🔷🔶

कोरोना महामारी चा काळा कालखंड मानवाला बरेच काही शिकवून गेला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे हा फार मोठा धडा हा विषाणू आपल्याला घेऊन गेला आहे. अस्सल माणुसकीचे असेच एक दर्शन कामोठे मधील एका सोसायटीत पहायला मिळाले.

सेक्टर 7 मधील न्यू कन्सेप्ट या सोसायटीमध्ये धनबहादूर शाही नावाचा सुरक्षारक्षक कामास होता. दुर्दैवाने त्याला covid 19 लागण झाली व त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.सोसायटीने मात्र त्याच्या कुटुंबीयांना वार्‍यावर न सोडता तब्बल दोन लाख रुपयांची भरघोस मदत त्याच्या कुटुंबियांना केली.

सचिव तानाजी गुतुकडे,सचिन भोईटे,हनुमंत कुंभार,नाना धोपरे,फिरोझ खान आदी सदस्यांनी पुढाकार घेतल्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून तब्बल दोन लाख रुपयांची मदत जमवण्यात आली. सदर रक्कम सुरक्षारक्षकांच्या पत्नीच्या स्वाधीन केल्यानंतर सोसायटीमधील सदस्यांना अश्रू अनावर झाले.

सुरक्षारक्षकाला आपल्या कुटुंबातील एक सदस्य प्रमाणे मानसन्मान दिल्यामुळे कामोठे येथील न्यू कन्सेप्ट सोसायटीमधील रहिवाशांचे सर्वत्र कौतुक होत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.