Press "Enter" to skip to content

रीक्षा चालकांना नव भारती शिव वाहतूक संघटनेचा आधार

रीक्षा चालकांना नव भारती शिव वाहतूक संघटनेचा आधार

जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप

रीक्षाचालकांच्या मुलांना मिळणार विनामूल्य शिक्षण

सिटी बेल लाईव्ह/पनवेल.

    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  आज भारतीय जनता पक्ष प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वतीने पनवेल येथे रिक्षाचालकांना अन्नधान्य वाटप, आणि रिक्षा करिता “सुरक्षित पडदा अंतर किट” तसेच मास्क आणि सॅनिटीझर वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी कार्य सम्राट आमदार मा.श्री. प्रशांत ठाकूर, नगर सेवक श्री.मनोहर म्हात्रे,श्री.मुकीत काझी, श्री.अजय बहिरा, पनवेल शहर अध्यक्ष श्री.जयवंत पगडे, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.आरिफ शेख, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री.निर्गुण कवळे, महासचिव इम्रान पवार आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पनवेल महानगर पालिका नगरसेवक श्री. मुकीत काझी यांनी रिक्षा चालकांच्या मुलांसाठी (याकूब हाई स्कूल, पनवेल) मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली

सदर कार्यक्रमाचे निमंत्रण तथा आयोजन नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य चिटणीस उबेद पवार तसेच उपचिटणीस शावेज रिझवी आदी मान्यवरांनी केले होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजक आणि निमंत्रक यांनी अशाच प्रकारचे मानवतावादी कार्य सुरू ठेवण्यासाठी याप्रसंगी मी शुभेच्छा देतो असे हाजी अराफत म्हणाले.
कोरोना महामारी च्या कालखंडात रिक्षा चालकांना फार मोठा फटका बसला.उदरनिर्वाहाचे साधन बंद असले तरी बॅंकांचे हप्ते मात्र सुरू असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले होते. नवभारती शिव वाहतूक संघटनेने रिक्षाचालकांच्या साठी पुढाकार घेत मदतीचा हात दिल्याने तमाम रिक्षाचालकांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.