महिला बालविकास व आदिवासी विकास विभागाकडून पोषण माह होतोय साजरा 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔶🔷🔶🔷
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय पोषण मिशन अभियाना अतंर्गत सर्व देशभरार महिला बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयातुन सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा करण्यात येतो आहे .
रायगड जिल्ह्यात या अभियानास 7 सप्टेंबर पासून सुरूवात झाली असून 30 सप्टेंबर पर्यत जिल्ह्यातील सर्व गावा गावा मधूनच पोषण आहार जनजागृती केली जात आहे .

रायगडच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन झाले असून जिल्हाधिकारी निधी चौधरी, मूख्यकार्यकारी आधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे महिला बाल विकासचे उपमुख्यकार्यकारी आधिकारी नितीन मंडलीक, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. सूधाकर मोरे ,एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प पेण च्या प्रकल्प आधिकारी शशिकला अहिरराव यांच्या प्रत्यक्ष सहभागाने हा पोषण माह साजरा होतो आहे.
जिल्ह्यातील कूपोषन कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे, किशोर वयीन मूला मूलीना लैंगिक शिक्षण देणे आदि उद्देशाच्या परिपुर्तेसाठी गावा स्तरावर प्रभातफेरी काढणे, कूपोषीत मुलांच्या घरी भेटी देणे,

गरोदरपणात महिलांनी घ्यावयाच्या काळजी बाबत माहिती देणे, स्तनपान योग्य पध्दतीने कसे करावे या बाबत मार्गदर्शन करणे आदि उपक्रमात या मोहिमेत राबवले जात आहेत.
सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर समतोल व गरम ताजा आहार महत्वाचा घटक असून हा या आहारात रायगड जिल्ह्यातील जंगलात मिळणा-या रानभाज्या चे प्रदर्शन भरवने या रानभाज्या मधुन मिळणाऱ्या वेगवेगळ्या जिवनसत्वाची माहिती दिली जात आहे.
प्रत्येक अगंवाडीत मध्ये अगंणवाडी सेविका, आशा वर्कर त्या भागातील प्राथमीक आरोग्य केंद्राचे आरोग्य आधिकारी कर्मचारी स्थानिक सामाजिक संस्था चे कार्यकर्ते अशे समन्वयातून तर शासकीय आदिवासी आश्रम शाळा मध्ये सूध्दा मूख्यध्यापक,अधिक्षक,
अधिक्षीका, शिक्षक आदि कर्मचारी सोशल डिस्टन्स व कोरोना चे सर्व नियम पाळत हे अभियान राबवत आहेत .

कूपोषन कमी करण्यासाठी अगंवाडी मध्ये शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. ए.पि.जे अब्दुल कलाम अम्रत आहार योजना, गरम ताजा आहार नियमीत आरोग्य तपासणी हे उपक्रम राबवले जात आहेतच, शासनाच्या निर्देशा प्रमाणे या वर्षी सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे.अंगवाडी सेवीका, मदतनीस,पर्यवेशीकाच्या व प्रकल्प आधिकारी यांच्या समन्वयाने सर्व जिल्हाभर हा पोषण माह मोहिमेच्या स्वरुपात राबवला जात आहे.
–नितीन मंडलीक (उपमुख्यकार्यकारी आधिकारी,रायगड जिल्हापरिषद )
पोषन माह मध्ये प्रत्येक आश्रमशाळे मध्ये रानभाज्या प्रदर्शन भरवले जात असून कोविड ची काळजी घेत आदिवासी कीशोरवयीन विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षका मार्फत लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जात आहेत .
–शशीकला आहिरराव (प्रकल्प आधिकारी ,एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प पेण )
या मोहिमेच्या माध्यमातून सहि पोषण चे धडे दिले जात असून फक्त एक महिनाच ही मोहीम न राबवता या मोहीमेत आखलेले सर्व कार्यक्रम हे नियमीत स्वरूपात घेतले जावेत अपूर्ण व कमी पोषण हे कूपोषनाचे महत्वाचे कारण असून या मोहीमेतून पोषण भरनावर जन जागृती केली जात आहे.
–अशोक जंगले (सदस्य नवसंजीवन समीती . संचालक कँन प्रकल्प ,कर्जत )







Be First to Comment