Press "Enter" to skip to content

पोल्ट्री व्यावसायिकांना तात्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा आंदोलन

  • पालकमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार — माजी जि.प.सभापती प्रमोद पाटील

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔶🔷🔶🔷

देशात कोरोनाने हाहाकार उडविला आहे त्यातच नुकताच झालेल्या चक्रीवादळामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले असून एकीकडे कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा रायगड जिल्ह्यातील व्यवसायिक आंदोलनाचा पवित्रा घेतील अशी भुमिका आज झालेल्या बैठकीत घेण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्याच्या काही मोजक्याच पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक पेण येथे घेण्यात आली या बैठकीला पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त सो.ची.म्हस्के, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, माजी जि.प. सभापती प्रमोद पाटील, पोल्ट्री व्यावसायिक अनिल खामकर, केसरी गावंड, राजेश पाटील, विलास साळवी रोहा, अनिल कामटे कर्जत, मिलिंद मोरे खालापूर, दिपक पाटील अलिबाग, विलास मोकल आदिंसह पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

या बिकट परिस्थितीतीला सामोरे जातांना पोल्ट्री व्यवसायकांना पशु खाद्य, तुस, कामगारांना पगार, लाईट बील, ग्रामपंचायत कर या सर्व गोष्टी वाढल्याने याकाळातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आला आहे.एकीकडे कंपनी खराब पशु धान्य देत आहे तर दुसरीकडे अनेकांचे दर वाढत आहेत मग या मध्ये पोल्ट्री व्यावसायिक जगणार कसे चक्रीवादळमुळे पोल्ट्रींचे लाखोंचे नुकसान झाले मात्र शासन भरपाई पोटी 5 हजार देत आहे यामुळे शासनाने व्यवसायिकांचा अंत न पाहता योग्यती भरपाई देण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील व्यवसायिक आंदोलनाचा पवित्रा घेतला असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 कोकणातील एक नंबरचा धंदा म्हणून पोल्ट्री व्यावसायिकांकडे पाहिले जायचे मात्र आताची परिस्थिती ही भयानक आहे या व्यवसायिकांना बॅंकासुध्दा लोन देण्यासाठी कुचरत असल्याने आपण येत्या काही दिवसांत जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे आणि खा. सुनिल तटकरे यांच्या बरोबर बैठक घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार
प्रमोद पाटील ----माजी जि.प. सभापती कृषी व पशुसंवर्धन 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.