सिटी बेल लाइव्ह / माथेरान (प्रतिनिधी ) 🔶🔷🔶🔷
अवघड प्रसंगी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत मदतीसाठी धावून जाणारे माथेरान मधील एकमेव निस्वार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर.
सध्या सर्वत्रच कोरोना या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने माथेरान मधील सर्वसामान्य लोकांना पुढील उपचारासाठी मुंबई अथवा अन्य ठिकाणी जावे लागते परंतु वेळेवर बेड उपलब्ध होत नसतात अशावेळी एकच नाव सर्वांच्या समोर उभे राहते ते म्हणजे मनोज खेडकर. आपल्या ओळखीच्या माध्यमातून आजवर अनेक रुग्णांची सोय आणि विशेष म्हणजेज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा काहींना सवलतीच्या दरात सुध्दा औषधोपचार मिळवुन दिले आहेत.ताबडतोब बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.आणि प्रत्यक्ष त्या रुग्णांची वेळेवर जाऊन विचारपूस करून काही मदत लागल्यास हसतमुखाने त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे येथील कोरोना बाधित अनेक रुग्णांनी लाभ घेऊन बरे होऊन आले आहेत.
केवळ दवाखान्याच्या सेवेपुरता मर्यादित न राहतान शैक्षणिक कार्यात सुध्दा त्यांचा मोठा हातभार इथल्या अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभला आहे. ज्यांची मुंबई पुण्यात कुठल्याही प्रकारची सोय नाही अशांना वेळोवेळी सहकार्याची भूमिका त्यांनी पार पाडली आहे.
त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मनोज खेडकर एक असामान्य निस्वार्थी व्यक्तिमत्त्व माथेरान करांना लाभलं आहे हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल असे धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी सांगितले







Be First to Comment