Press "Enter" to skip to content

सिटी बेल इफेक्ट :उरणच्या रस्त्यावरील सळ्या, दगड हटवले


सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी : 🔶🔷🔶🔷

उरण शहरात नगर परीषदेच्या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रस्त्यावर ब्लॉक लावण्याचे काम सुरू केले होते हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कामगारांनी रस्ता खोदताना तुटलेल्या सळ्या ,दगड रस्त्यावच टाकले होते यामुळे रस्त्यावरून ये जा करनार्या नागरीकांना लागून अपघाताचा धोका निर्माण झाला होता.

या मथळ्याखाली १९ सप्टेंबर २०२०रोजी सीटी बेल लाइव्ह ने बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल उरण नगरपरिषदे घेतली असून ठेकेदाराकडून रस्त्यांवरील तुटलेल्या सळ्या , दगड उचलण्याचे काम सुरू आहे. या युद्ध पातळीवर सुरू केलेल्या कामा बद्दल उरण मधील नागरिक सिटी बेल लाइव्ह व उरण परिषदेचे आभार मानून धन्यवाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.