Press "Enter" to skip to content

चिरनेर येथील इंद्रायणी डोंगरावर वृक्षारोपण उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / उरण (सुभाष कडू) 🔷🔶🔷🔶

उरण तालुक्यातील नामवंत पत्रकार जीवन केणी यांच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त आज इंद्रायणी डोंगर पठारावर वृक्षारोपण करण्यात आले.त्यांच्या मित्रपरिवाराच्या साक्षीने फणस,काजू,बदाम,गुलमोहर,सुबाभूळ व अन्य उपयोगी एकूण 47 झाडांची लागवड करण्यात आली आहे.

मागील 20 वर्षे विविध नामांकित वृत्तपत्रात वृत्तांकन करणारे व सहा वर्षे दैैनिक पुढारीच्या रायगड आवृत्तीमध्ये उरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले उरण तालुक्यातील सर्वांनाच परिचित असलेले उरण तालुक्यातील चिरनेर येथील भूमिपुत्र असलेले जीवन केणी यांनी त्यांच्या लेखणीतून अनेकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

त्यांचा 47 वा वाढदिवस कोरोना संसर्गाच्या फैलावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने प्रदूषण मुक्तीसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्या मदतीने इंद्रायणी डोंगर पठारावर वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता.त्यानुसार काल इंद्रायणी डोंगरपठारावर फणस,काजू ,बदामासह विविध प्रकारच्या 47 झाडांची लागवड सकाळच्या सत्रात करण्यात आली असून ही लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संरक्षण करून जगविण्याचा निर्धार यावेळी त्यांनी केला आहे.

याप्रसंगी जिव्हाळा फाऊंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश पाटील,वन्यजीव निसर्ग संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी,उपाध्यक्ष आंनद मढवी, काशिनाथ खारपाटील, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे, महेश भोईर,सुभाष कडू,पंकज ठाकूर मनोज पाटील,सचिन वर्तक ,प्रशांत पाटील,किशोर पाटील,शिवकुमार भेंडे,गुरूनाथ कातकरी आदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.