Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सर्वोत्कृष्ट व्याख्याता म्हणून नंदकुमार मरवडे यांचा सन्मान


सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) 🔶🔷🔶🔷


 रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली गावचे सुपुत्र,उपक्रमशील तथा आदर्श शिक्षक नंदकुमार विठोबा मरवडे यांना युवा अविष्कार सांस्कृतिक कला मंच आयोजित राज्यस्तरीय आँनलाईन वत्कुत्व स्पर्धा -२०२० या राज्यस्तरिय वक्तृत्व स्पर्धेमध्ये नंबर वन सर्वोत्कृष्ट व्याख्याता Most popular speaker- 1 चे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
    

युवा अविष्कार सांस्कृतिक कला मंच  आयोजित राज्यस्तरीय आँनलाईन वत्कुत्व स्पर्धा -२०२० वक्तृत्व स्पर्धेमध्ये राज्यभरातून एकूण ६० स्पर्धक सहभागी झाले होते या राज्यस्तरीय आँनलाईन वत्कुत्व स्पर्धेचे परीक्षक तथा  युवा अविष्कार सांस्कृतिक कला मंच चे अध्यक्ष प्रशांत यादव ,सचिव डॉ.सौ.रत्नप्रभा माने यांच्या माध्यमातून स्पर्धेचे निकाल दि.१६/०९/२०२० रोजी जाहीर करण्यात आला.

यामध्ये  उपक्रमशील तथा आदर्श शिक्षक नंदकुमार  मरवडे  यांनी रायगड जिल्ह्याचे नेत्रुत्व करीत नंबर वन सर्वोत्कृष्ट व्याख्याता Most popular speaker-1 हा बहुमान पटकावल्याने त्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र बहाल करून पुढील उज्ज्वल वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या आहेत.
  

  शिक्षकी पेशा शिवाय,अभ्यासू पत्रकार असल्याने प्रत्येक क्षेत्रातील विषयांचा सखोल अभ्यास,निरंतर वाचन,मराठी भाषेवर प्रभुत्व तसेच लेखनाची विशेष आवड असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक,त्यांची” हास्यतरंग” एक पात्री विनोदी,मनोरंजक नाटिका खूप प्रसिद्ध व लोकप्रिय असल्याने तिचे यशस्वी प्रयोग संपूर्ण रायगड जिल्ह्यातील महाड,तळा रोहा तालुका परिसर,पंचक्रोशी मध्ये विविध कार्यक्रम प्रसंगी “हास्य तरंग”चे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत तसेच तालुका परिसर,पंचक्रोशीमध्ये शैक्षणिक,सामाजिक अथवा राजकीय स्तरावरील  सभा किंवा बैठकीचे आयोजन असेल तर तेथील एक उत्कुष्ठ सुत्रसंचालन करणारे तसेच समालोचक म्हणूनही त्यांचा विशेष नावलौकिक आहे.
   

सन- २०११ रोजीचे रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाय विविध क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून शेकडो पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.
  

राज्यस्तरीय आँनलाईन वत्कुत्व स्पर्धेचे निकाल समजताच त्यांच्या दैदिप्यमान  उल्लेखनीय यशस्वी कामगिरी बद्दल तळवली तर्फे अष्टमी ग्रामस्थ, महिला क्रीडा मंडळ तळवली यांच्यासह,नशिप्र मंडळाचे चेअरमन महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक मंडळ,तसेच त्यांचे सर्व माध्य.व प्राथमिक शिक्षक मित्र,शिक्षण प्रेमी नागरिक,पत्रकार मित्र परिवार तसेच तालुका कुणबी समाजबांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन व्यक्त करून पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.