Press "Enter" to skip to content

भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश माेहिते यांना सतावतेयं जीवाची भिती

जेएसडब्ल्यू कंपनीचे सज्जन जिंदाल यांच्याकडून जीवीतास धाेका असल्याची ॲड.मोहीते यांची तक्रार : जिल्हाधिकारी यांच्याकडे पाेलिस संरक्षणाची मागणी 🔶🔷🔶🔷


सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶

जेएसडब्ल्यू कंपनीने कांदळवनाची केलेली कत्तल आणि खाडीमध्ये अवैध भरावाबाबतची तक्रार भाजपाचे  जिल्हाध्यक्ष ॲड. महेश माेहिते यांनी केली हाेती. त्यानुसार काही दिवसांपूर्वी वन प्रशासनाने स्थळ पाहणी अहवालाची प्रक्रीया राबवली हाेती, परंतू स्थानिकांनी ती कंपनीच्या इशाऱ्यावर उधळून लावली हाेती. याप्रकरणात कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासाकडून  जीवीतास धाेका असल्याने पाेलिस संरक्षण मिळावे अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड.महेश माेहिते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

संरक्षीत असणाऱ्या कांदळवनांची कत्तल करुन तसेच खाडीमध्ये बेकायदा भराव करुन जेएसडब्ल्यू कंपनी कायदा धाब्यावर बसवत आहे. याबाबत संबंधीत कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ॲड. माेहिते यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पाेलिस अधिक्षक आणि जिल्हा वनसंरक्षक यांच्याकडे केली हाेती. त्यानुसार 16 सप्टेंबर राेजी वन विभागाने स्थळपाहणी करण्याचे ठरवले हाेते. पंचनाम्यासाठी संबंधीताना नाेटीस देण्यात आली हाेती. जागेवर पाेचल्यानंतर सुमारे 80 नागिरक माेठ्या संख्येने तेथे पाेचले. त्यांनी गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. कंपनीच्या सांगण्यावरुनच त्यांनी स्थळपाहणी अहवाल राेखला.

माझे सहकारी परशूराम म्हात्रे, अनंता पाटील, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील यांना धमकवण्यास सुरुवात केल्याचे अॅड. माेहिते यांनी दिलेल्या अर्जात नमुद केले आहे.जमाव माेठा असल्याने वडखळ पाेलिस ठाण्यातील एक  पाेलिस वन विभागाचे अधिकारी, खारभूमी  विभागाचे अधिकारी हतबल झाले हाेते.संबंधीत कंपनीने षडयंत्र रचून स्थळ पाहणीच्या सरकारी कामात अडथळा आणला आहे.

कंपनीने केलेली कृत्य बाहेर काढत असल्याने माझ्या जीवीतास कंपनीचे सर्वेसर्वा सज्जन जिंदाल आणि कंपनी प्रशासनाकडून धाेका निर्माण झाला आहे. भाजपाचा जिल्हाध्यक्ष असल्याने रात्री-अपरात्री बाहेर जावे लागते. संबंधीतांकडून माझ्याबाबत घातपात हाेण्याची शक्यता असल्याने सदर प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यां विराेधातही कठाेर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.