Press "Enter" to skip to content

आदिवासी बांधवांना माणुसकीचा मदतीचा हात श्रद्धा फाउंडेशनचे कार्य महान !

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत – सुभाष सोनावणे 🔷🔶🔷🔶

आज कोंदिवडे ग्रामपंचायत हद्दीतील खैरवाडी आणि उंबरवाडी मधील ५४ आदिवासी बांधवाना एक महिना पुरेल इतके कोरडा शिधा , तेल , डाळी , धान्य , पीठ , तसेच इतर किरकोळ वस्तूंचे वाटप श्रद्धा फाऊंडेशन च्या सहकार्याने करण्यात आले .

श्रध्दा फाउंडेशन ही सेवाभावी संस्था कर्जत तालुक्यात वेणगांव येथे आहे . कोरोना महामारीच्या भीषण काळात लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने रोजगार अभावी उपासमारीची वेळ आदिवासी बांधवांवर आलेली असताना श्रद्धा फाउंडेशनने माणुसकीचा मदतीचा हात पुढे करत त्यांच्या गरजेला धावून आली आहे .

कर्जत तालुक्यातील कोंदिवडे ग्रामपंचायत पंचक्रोशीतील खैरवाडी व उंबरवाडी या दोन आदिवासी वाडीतील ५४ कुटुंबांना एक महिना पुरेल इतके धान्य वाटप करण्यात आले .

यावेळी श्रद्धा फाऊंडेशनचे श्री . बसवराज , सचिन म्हसे , शैलेश , अख्तर , नितेश शर्मा , सामाजिक कार्यकर्ते श्री . रमेश मुंढे , श्री . प्रमोद पाटील आदी सहकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.