Press "Enter" to skip to content

विषुवदिन : दिवस – रात्र समान १२-१२ तासांची विशाल कुंभारेंची खगोलीयन माहिती

सिटी बेल लाइव्ह /गोवे-कोलाड( विश्वास निकम )🔷🔶🔷🔶

अवकाशात घडणाऱ्या विविध घटना खगोलप्रेमींबरोबरच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. दिवस-रात्र लहान किंवा मोठी, दक्षिणायन- उत्तरायण, सुपरमून, ग्रहणे अशा काही ठराविक दिवशी घडणाऱ्या घटनांचे विशेष अप्रूप असते.

२२ सप्टेंबर दिवसही विशेष आहे, या दिवशी दिवस आणि रात्र समान असणार आहे. बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र अनुभवण्यास मिळणार असल्याची खगोलीयन माहिती ग्लोबल मिशन अॅस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर पुणेचे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी खास प्रतिनिधीला दिली.

सूर्य २२ किंवा २३ सप्टेंबर आणि २१ मार्च या दिवशी खगोलीय विषुववृत्तावर असतो. त्यामुळे बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र असते. म्हणून या दिवसांना ‘विषुवदिन’ असे म्हंटले जाते.

याबाबत भौगोलिक वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे. पृथ्वीच्या परिवलनाचा अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाच्या संदर्भात सुमारे २३.५ अंशाने झुकलेला आहे. त्यामुळे तिचा उत्तर व दक्षिण गोलार्ध सूर्याकडे कमीअधिक झुकलेला असतो. यामुळे पृथ्वीवरील दिवस व रात्र लहान व मोठी होते. पण वर्षांतून दोनवेळा (मार्च व सप्टेंबर महिन्यात) अशी स्थिती येते की, पृथ्वीचा कोणताही गोलार्ध सूर्याकडे झुकलेला नसतो. ही अवस्था म्हणजे ‘संपात बिंदू’ मार्च महिन्यात ही अवस्था २१ मार्च रोजी येते, याला ‘वसंत संपात बिंदू’ तर सप्टेंबर महिन्यात हि अवस्था २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी येते, याला ‘शरद संपात बिंदू’ म्हणतात. या दोन्ही दिवसांना ‘ विषुवदिन’ असेही म्हणतात. पण प्रत्यक्षात दरवर्षी वसंत संपात २१ मार्चलाच होईल असे नाही. तर तो १९, २० किंवा २१ मार्च रोजीही येत असतो. अशी विश्वास हर्त माहिती खगोल शास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली आहे.

पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून २३.५ अंशाने कललेला आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रृवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर सारखेच असते.
पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे हिवाळा असतो. तर कमी-जास्त तापमानामुळे हे ऋतू होतात.

आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल.

ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून पर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’असे म्हणतात. तर २२ सप्टेंबर ते २२ डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर २१ मार्च आणि २२ किंवा २३ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो. ह्या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. ह्या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात. असे शेवटी विशाल कुंभारे यांनी म्हटले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.