सिटी बेल लाइव्ह / उरण / रमेश थळी : 🔶🔷🔶🔷
उरण शहरात नगर परीषदेच्या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने रस्त्यावर ब्लॉक लावण्याचे काम सुरू केले आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराकडे काम करणारे जे कामगार आहेत त्यांना धड हिंदी भाषा बोलता येत ना मराठी. अशा कामगारांना कोण सांगणार, त्या कामगारांवर देख रेख करण्यासाठी मुकादम नसल्यामुळे त्यांना कामाची माहिती नसल्यामुळे ते कामगार रस्ता खोदताना तुटलेले कॉंक्रिट दगड, सळ्या, रस्त्यावर टाकत आहेत. याच रस्त्यावरून बाजारपेठेत ये-जा करणार्या नागरींकाची ये-जा सुरू असते.

सध्या कोरोनाच्या विचाराने सुरक्षित अंतराचा विचार करत चालताना नागरिक त्रस्त असल्याने पायाखाली सळ्या दगड आहेत याचे भानच नसते. न जाणे चुकून पायाला दगड, गंजलेली सळी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच बाईक वाल्यांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या विषयी उरण नगर परिषदेने लक्ष देऊन हा रस्त्यावर टाकलेला माल उचलून एका ठराविक जागेत टाकण्याचे आदेश सबंधीत ठकेदाराला द्यावेत अशी मागणी उरण मधील सुज्ञ नागरींकाकडुन होत आहे.







Be First to Comment