Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खारघरमध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान

सिटी बेल लाइव्ह / खारघर : 🔶🔷🔶🔷

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत प्लास्टिक मुक्ती व स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती पनवेल महानगरपालिका सन्माननीय नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्या पुढाकाराने व जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी व खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष बिना गोगरी यांच्या सहकाऱ्यांने कार्यक्रमाच्या संयोजिका खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम व सहसंयोजक राजेंद्र प्रभू यांनी सेक्टर 11 भाजी मार्केट मध्ये प्लास्टिक मुक्ती अभियान व स्वच्छता मोहीम उपक्रम राबविला.

या मोहिमे अंतर्गत लोकांना प्लास्टिक बंदीचे महत्त्व पटवून देण्यात आले व कापडी पिशव्या वाटप करून लोकांना घराबाहेर निघताना कापडी पिशवी घेऊन च निघण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी सभापती व पनवेल महानगरपालिका सन्माननीय नगरसेवक अभिमन्यू पाटील, स्थायि समिती सभापती प्रवीण पाटील , खारघर तळोजा मंडळ शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा सहप्रमुख गीता चौधरी, उपाध्यक्ष खारघर तळोजा मंडळ बिना गोगरी ,खारघर तळोजा मंडळ महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, सहसंयोजीका सोशल मीडिया उत्तर रायगड जिल्हा भाजपा मोना अडवणी, आशा शेडगे, अश्विनी भुवड, काशिनाथ घरत, सुर्वे काका इ. मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.