सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔷🔶🔷🔶
रसायनी पाताळगंगा हे औद्योगिक क्षेत्र असल्याने कोन -रसायनी आणि दांड-मोहोपाडा-पराडे या रस्त्यावरून अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते.या परीसराची वासांबे मोहोपाडा ही मुख्य बाजारपेठ असल्याने दांड-मोहोपाडा-पराडे या रस्त्यावरून परिसरातील वाहनांपेक्षा अवजड वाहनांची गर्दी दिसून येते.यामुळी अपघात व वाहतुक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत.
दांड-मोहोपाडा-पराडे हा रस्ता एमआयडीसी सेवेसाठी नसतानाही या रस्त्यावरून ४० फुट लांब कंटेनर, रसायनी पाताळगंगा एमआयडीसी परीसरात जाणारे अवजड कंटेनर, मोठमोठे टॅंकर या रस्त्यावरून ये जा करीत असतात.यातच रसायनी मोहोपाडा हा सर्व्हिस रस्ता एकेरी असून त्याला जोड असा पर्यांयी दुसरा मार्ग नाही.
दरम्यान दांड-मोहोपाडा रस्त्यावर ४० फुटी अवजड कंटेनर बंद पडल्यास अथवा कलंडल्यास मोठा अपघात होवून वाहतूक कोंडी होवू शकते व तसे प्रकारही घडले आहेत.
दांड-मोहोपाडा रस्त्यावरील अवजड वाहनांची समस्या सोडविण्यासाठी एसटीबसपेक्षा दोन फुट उंची असलेली लोखंडी कमानी दांडफाटा आणि पराडेवाडी येथे उभारुन शेजारी लक्षवेधक फलक लावल्यास दांड-मोहोपाडा रस्त्यावरून ४० फुटी कंटेनर अथवा औद्योगिक क्षेत्रात इतर अवजड वाहन या रस्त्यावरून येणार नाहीत.याकरिता परिसरातील ग्रामपंचायत, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन दांड-मोहोपाडा रस्त्यावरील दांड आणि पराडेवाडी येथे लोखंडी कमानी उभारावी अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड यांनी केली असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र दिले आहे.







Be First to Comment