प्रस्तावित महापालिका मुख्यालयात सुसज्ज वाचनालय आणि प्रस्तावित क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात इनडोअर क्रीडा संकुल व जलतरण तलाव असावा… 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (विशेष प्रतिनिधी ) : 🔷🔶🔷🔶
महासभेत मा. उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महानगरपालिकेच्या प्रस्तावित मुख्यालयात संदर्भ विभागासह एक सुसज्ज वाचनालय आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव,बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुल असावे,अशी मागणी केली.
शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. महासभेत प्रस्तावित पालिका मुख्य कार्यालयाचा आराखडा मांडण्यात आला. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रस्तावित क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा ठरावही चर्चेसाठी आला होता. त्यावर झालेल्या चर्चेदरम्यान भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि पनवेल महापालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी काही महत्वपूर्ण मागण्या केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्र होणे हे गरजेचे असून त्यांचं बरोबरीने जागा मोठी असल्याने त्यामध्ये एक आंतराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव,बास्केट बॉल कोर्ट व इनडोअर क्रीडा संकुल देखील असावे जेणेकरून क्रीडा क्षेत्रातील युवांना त्याचा मोठा उपयोग होऊ शकेल अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली. तसेच नगरसेवक, पत्रकार, संशोधक यांच्याकरिता पालिकेच्या प्रस्तावित कार्यालयात एक सुसज्ज वाचनालय आणि सुसज्ज असा संदर्भ विभागही असला पाहिजे,ज्या मध्ये नगरसेवकांना जुने महासभेचे ठराव,इतिवृत्त,सरकारी अधिनियम – अधिसूचना, सरकारी नियमावली अश्या विषयांचे संदर्भ अभ्यासाकरिता उपलब्ध होऊ शकतील असे विक्रांत पाटील म्हणाले.
ऑनलाइन महासभेत खूप तांत्रिक अडचणी येतात, अनेकवेळा महत्वाच्या क्षणी संपर्क तुटतो आणि जनतेचे प्रश्न मांडण्याचे महत्त्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या सभागृहाचा हा अपमान आहे, असेही ते म्हणाले. महासभेचा पोरखेळ होतो याविषयी विक्रांत यांनी नाराजी व्यक्त केली. आता सर्वच गोष्टी बऱ्यापैकी सुरू झालेल्या आहेत तसेच विधान सभेचे अधिवेशन ही नियमावली पाळुन नुकतेच पार पडले त्यामुळे पुढील महासभा कोव्हिड नियमावलीचे पालन करून प्रत्यक्ष स्वरूपात भरविण्यात यावी असे विक्रांत पाटील यांनी सुचविले आहे.







Be First to Comment