Press "Enter" to skip to content

तुपगाव ग्रामपंचायतीकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेस प्रारंभ

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🔶🔷🔶🔷

देशावर कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे.सहा ते सात महिन्यांपासून आपण सर्वंच जण कोरोना विषाणूशी लढाई लढत आहोत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन आणि प्रशासन शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत.शासनाने कोरोना नियंत्रणासाठी तसेच मृत्यू दर कमी करण्यासाठी माझे कुटुंब-माझी जबाबदारी कोरोनामुक्त महाराष्ट्र ही मोहीम राज्यभरात सुरू झाली आहे.

याअनुषंगाने या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी सरपंच महेश परीट,ग्रामसेवक संदिप कुराडे ,आरोग्यसेवक चव्हाण, आरोग्यसेविका तांडेल,तुपगाव तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव,माजी सरपंच शरीफ भालदार यांच्या शुभहस्ते आरोग्य पथकासमवेत करण्यात आला.

यावेळी कुटुंबातील सदस्यांची शारिरीक तापमान व आॅक्सिजन पातली तपासून तशी नोंद करण्यात आली. माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत शहर,गावे,वाड्या वस्त्या,तांडे यांची आरोग्य तपासणी,कोविड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तिश भेटून आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.

माझे कुटूंब-माझी जबाबदारी ही मोहीम कोरोना साथ नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.अनलाॅक प्रक्रीया सुरू असताना जनजीवन पुर्वपदावर आणण्याबरोबरच कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेट देऊन आरोग्य ,शिक्षण, महत्त्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार,लठ्ठपणा यासारखे महत्त्वाचे आजार असणा-या व्यक्ती शोधण्यात येणार आहेत.

याकरिता तुपगाव ग्रामपंचायत हद्दीत दोन पथके नेमण्यात आली असून त्यांना ओलखपत्र,टोपी व आरोग्य आवश्यक साधने देण्याचे नियोजन ग्रामसेवक संदिप कुराडे यांनी केले आहे.माझे कुटूंब -माझी जबाबदारी उपक्रमाअंतर्गत शुभारंभप्रसंगी विजय भालेकर,गुलाब गुरव, सदाशिव सालवी,कमल कुंभार, शबाना खेसे, अनिता मोरे,आश्विनी गायकवाड, पाणीपुरवठा अध्यक्ष विजय ठोसर आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.