चिरनेर पंचक्रोशीतील १७८ स्थानिक भूमिपुत्रांवर होणारा अन्याय सहन करणार नाही – राजेंद्र भगत 🔷🔶🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी ( वार्ताहर ) 🔶🔷🔷🔶
चिरनेर पंचक्रोशीतील भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून अशा भूमीत उभारण्यात आलेल्या मे.स्टेलर व्हाल्युचैन सोल्युशन प्रा.लि.या मालाची हाताळणी करणाऱ्या प्रकल्पात काम करणाऱ्या १७८ कामगारांना प्रकल्पातील अधिकाऱ्यानी कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेत आहे.त्यामूळे १७८ कामगारांच्या कुटुंबावर करोनाच्या पार्श्र्वभूमीवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
अशा १७८ स्थानिक भूमिपुत्रांवर होणारा अन्याय येथील भुमीपुत्र कदापी सहन करणार नाही.त्याच्या न्याय हक्कासाठी येथील भूमिपुत्र रस्त्यावर उतरेल असा इशारा उरण विधानसभा मतदारसंघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी प्रकल्प व्यवस्थापनाला दिला आहे.
मोठी जुई,विंधणे आणि चिरनेर येथील भूमीत उभारण्यात आलेल्या मे.स्टेलर व्हाल्युचैन सोल्युशन प्रा.लि. या प्रकल्पात लोडर,सर्वेअर आणि हेल्पर मध्ये काम करणाऱ्या १७८ कामगारांना प्रकल्पातील अधिकाऱ्यानी कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामूळे या प्रकल्पातील १७८ कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी न्यु मेरीटाई अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत,नंदराज मुंगाजी,वैभव पाटील,किरिट पाटील,पी.के.रमण तसेच राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष घरत, विश्र्वास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि १४ सप्टेंबर पासून प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा सहावा दिवस असून या आंदोलनाला इंटक संघटनेचा जाहीर पाठिंबा देताना इंटकचे युवा अध्यक्ष राजेंद्र भगत हे बोलत होते.

राजेंद्र भगत यांनी बोलताना सांगितले की कामगार नेते महेंद्र घरत,नंदराज मुंगाजी, वैभव पाटील हे कामगारांना, प्रकल्पग्रस्ताना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने शासनस्तरावर,प्रकल्प व्यवस्थापना जवळ प्रयत्न करत आहेत.हे कोणीही नाकारू शकत नाहीत.त्यामूळे कामगार नेते महेंद्र घरत हे १७८ कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.परंतु मे स्टेलर प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने हे विसरता कामा नये की चिरनेर पंचक्रोशीतील भूमी पुत्रांनी आपल्या न्याय हक्कासाठी ब्रिटिश सरकार विरोधात आंदोलन उभारले होते.त्याच शुरविरांच्या भूमीत मे.स्टेलर व्हाल्युचैन सोल्युशन प्रा.लि.हा मालाची हाताळणी करणारा प्रकल्प उभा राहिला आहे.अशा प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने येथील विविध पक्षांच्या नेत्यांना, स्थानिकांना दिले होते. परंतु देशातील जनता करोनाच्या संकटाचा सामना करत असताना, न्यु मेरीटाई अँड जनरल कामगार संघटना आणि राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या कामगार संघटनेत काम करणाऱ्या १७८ स्थानिक भूमिपुत्रांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता मे स्टेलर प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने तडकाफडकी कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.ही खेदाची बाब असून,अशा स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी न्यु मेरीटाई अँड जनरल कामगार संघटनेच्या आणि राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या मागे या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र, सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय पादुका बाहेर ठेवून खंबीरपणे उभा राहणार आहे. असा इशारा शेवटी इंटकचे युवा अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी दिला आहे







Be First to Comment