Press "Enter" to skip to content

कानसा वारणा फाउंडेशनच्या नियुक्त्या जाहीर

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔶🔷

वावर्ले चौक येथील कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक गणपत पाटील यांच्या कानसा वारणा फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची राज्यात विविध ठिकाणी चर्चां असून कोरोना पाश्र्वभूमीवर फाउंडेशनच्यावतीने विविध कार्यक्रम सुरू आहेत.यात जिल्ह्यांत रक्तदान शिबीर,गरजू गोरगरीबांना धान्यासह किराणा सामान वाटप, आदीवासीबांधवाना आर्थिक मदत ,कोविड योध्दांचा सन्मान व नागरिकांत कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे.

फाउंडेशनच्यावतीने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन विविध जिल्ह्यांत कार्यंतत्पर व्यक्तींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

कानसा वारणा फाउंडेशनच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी शेखर बोराडे,नाशिक जिल्हा अध्यक्षपदी संदिप सोमनाथ कुटे, अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी भागवत बाबूराव सांगले, पश्र्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी जयवंत सिताराम माने,सोशल मिडिया महाराष्ट्र अध्यक्ष पदी महेश चव्हाण, कोल्हापूर महिला अध्यक्षपदी जयश्री पाटील यांच्यावर पदभार सोपविण्यात आला.कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपकदादा गणपत पाटील,अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.