Press "Enter" to skip to content

माचेला चिरबी खारबंधिस्ती वरील स्थळ पाहणी संतप्त शेतकऱ्यांनी उधळली

भाजप रायगड जिल्हाध्यक्ष ऍड.महेश मोहिते यांना घ्यावा लागला काढता पाय 🔷🔶🔷🔶

या कामाचा पाठपुरावा आम्ही गेल्या 5/6 वर्षांपासून करीत असताना ऍड. महेश मोहिते तुम्ही होतात कुठे ? स्थानिक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल 🔶🔶🔷🔷

राजकारण आले अंगलट 💠🌟🌟💠

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 💠🌟💠🌟

गडब् माचेला,खारपाले,जुई अब्बास येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समुद्राचे खारे पाणी घुसून उध्वस्त झाल्या होत्या. म्हणून जेएसडब्ल्यू कंपनी येथे खार बांध बंदिस्तीचे काम खारलँड विभागाच्या मार्गदर्शनासाठी करत आहे. मात्र ऍड. मोहिते यांनी जेएसडब्ल्यू कंपनी च्या मालकांविरोधात कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन हे काम थांबविण्याकामी पुढाकार घेऊन स्थळ पाहणी नुकतीच आयोजित केली होती.

ही बाब स्थानिक शेतकऱ्यांना समजल्यावर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली व याचे पर्यवसान शासनावर दबाव टाकून आयोजित केलेल्या स्थळ पाहणी उधळून लावण्यात झाले. सन 2014 पासून गडब, माचेला,खारपाले,जुई अब्बास येथील शेतकऱ्यांच्या जमिनी समुद्राचे खारे पाणी घुसून उध्वस्त झाल्या होत्या व त्यासंदर्भात येथील स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ हे शासनदरबारी आई अकादेवी प्रकल्पग्रत शेतकरी सामाजिक विकास संस्था व अरुण शिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु ज्या खारलँड डिपार्टमेंट ची सदरील बांधाची कामे करण्याची जबाबदारी असताना कोणत्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे एकूण पाच ते सात हजार एकर जमिनी उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असताना खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाने विधिमंडळ पावसाळी अधिवेशन नागपूर 2018 मध्ये आमदार अनिकेत तटकरे यांनी सदर प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव करून दिली.

त्यावर सभापतींनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच याच विषयी व नुकसान भरपाई संदर्भात धनंजय मुंढे, अनिकेत तटकरे, जगन्नाथ शिंदे साहेब, धैर्यशील पाटील यांनी मुंबई अधिवेशन येथे उपस्थित करून त्वरित निर्णय घेण्यास भाग पाडले. परंतु खारभूमी विभागाकडे निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून दुर्लक्ष केले जातं होत. खारभूमी विभागाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील कंपनी ने सीएसआर फंड वापरून करण्याचे ठरून सदरील बांधाच्या दुरुस्तीचे काम खारलँड विभागाच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली हाती घेतले होते.

भर पावसातही सदरील काम चालू होते आणि माचेला चिरबी येथील खंडीचे काम पूर्ण केले. सदरील काम सुरु असतांना किंवा स्थानिक शेतकरी सदरील कामाचा पाठपुरावा गेल्या 5/6 वर्षांपासून करीत असताना ऍड. महेश मोहिते हे कोठेही दिसले नाहीत. आणि अचानक सदरील कामामुळे कांदळवणाची नासधूस झाली असे समजून जेएसडब्ल्यू कंपनी च्या मालकांविरोधात कारवाई होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार अर्ज देऊन सदरील काम थांबविण्याकामी पुढाकार घेत असल्याचे सर्व स्थानिक शेतकऱ्यांना समजल्यावर सदरील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली व याचे पर्यवसान सदर आयोजित केलेली स्थळ पाहणी उधळून लावण्यात झाले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील, श्री तुळशीदास कोठेकर,श्री परशुराम मोकल,श्री आत्माराम म्हात्रे,श्री मोरेश्वर म्हात्रे,श्री दिगंबर पाटील,श्री लक्ष्मण पाटील,श्री सिताराम चवरकर,श्री मिलिंद पाटील,श्री कमलाकर पाटील,श्री प्रभाकर पाटील,श्री राजू पाटील, श्री सखाराम पाटील,श्री किरण तुरे माजी सरपंच खारपाले,अकरा गाव जमिन बचाव संघर्ष कृती समिती,जुई अब्बास, देवळी,ढोबी, खारपाले, गडब जवळ जवळ 70 ते 80 स्थानिक शेतकरी उस्फुर्तपणे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.