सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू): 🔶🔷🔶🔷
लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्थापन केलेल्या उरण-पनवेल विभाग लॉरी मालक चालक संघटनेची सर्वसाधारण मासिक सभा जासई येथील संघटनेच्या कार्यालयात अमृत ठाकुर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
यावेळी अध्यक्षपदी विनय घरत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रदीप म्हात्रे आणि उमेश घरत यांची तर खजिनदार पदी विजय नाईक यांची तर सेक्रेटरीपदी समीर पाटील, सहसेक्रेटरीपदी संतोष आ. घरत यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, सतीश घरत, रमाकांत म्हात्रे, सुनिल घरत, मेघनाथ म्हात्रे, डी. आर पाटील, जी सी घरत, एस. के. घरत, पंडीत घरत, बळीशेठ घरत, सचिन घरत, विशाल म्हात्रे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. उपस्थितांचे आभार खोत यांनी मानले. नवनिर्वाचित कार्यकारणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







Be First to Comment