सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे :🔷🔶🔷🔶
सुखात सगळे असतात परंतु दुःखात जो कुणी पुढाकार घेऊन देवासारखा मदतीला धावून जातो तोच खरा सत्वशील आणि दातृत्वांचे संस्कार जोपासलेला सतकर्मी असतो.
नुकताच काही दिवसांपूर्वी येथील गणेश जनार्दन आखाडे यांच्या घोड्याचा विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला होता. काही दिवसांवर पर्यटन हंगाम येऊन ठेपलेला असताना अचानकपणे गणेश आखाडे यांच्या व्यवसायावर घाला घातला गेला आहे.
त्यामुळे काय करावे याच विवंचनेत असताना येथील दानशूर व्यक्तिमत्त्व असलेले नगरपरिषदेतील
विरोधीपक्ष नेते शिवाजी शिंदे
यांच्या प्रयत्नातून गणेश जनार्दन आखाडे यांना आर्थिक मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे आखाडे यांच्या कुटुंबातील सदस्यांना काही प्रमाणात का होईना ऐन संकटकाळी मदतीचा हातभार लागला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वीज वितरण कंपनीच्या अयोग्य नियोजना अभावी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षित पणामुुुळे इथे शॉक लागून एकना एक घोडा दगावतो पण कष्टकरी अश्वपालकांना कोण मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही आधिकारी वर्ग सुद्धा लक्ष देत नाहीत ते हात झटकून मोकळे होतात.
ज्याचा घोडा शॉक लागून दगावला आहे त्या अश्वपालकाला अनेकदा शासकीय मदत येण्याची वाट पहात बसावी लागते परंतु प्रत्येकवेळी अश्वपालकांची घोर निराशा झाली आहे.
शिवाजी शिंदे यांनी या कठीण प्रसंगी आखाडे कुटुंबाला आर्थिक हातभार लावल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकळे यांनी शिवाजी शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानले.







Be First to Comment