सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड) 🔷🔶🔶🔷
अंबानी रुग्णालयाचा कोव्हीड रुग्णासाठी वापर का होत नाही ? असा सवाल भाजप करत आहे. कर्जत मध्ये पत्रकार संतोष पवार यांचा व इतर काही रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्यामुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
धीरूभाई अंबानी हॉस्पिटलला इमर्जन्सी कोव्हीड सेंटर का घोषित केल नाही ? व सदर हॉस्पिटलमधील सुविधांचा, क्षमतेचा व डॉक्टरांचा उपयोग का करून घेतला नाही ? इतकी हलगर्जी का ? असे सवाल भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव हृषीकेश जोशी यांनी उपस्थित केले आहेत.
या बाबत जोशी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. तसेच जोशी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ माने यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन डॉ माने यांनाही दिलेले आहे. पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यू नंतर जिल्हाधिकारी यांनी ऑक्सिजन यंत्रणेसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती केली असून या आधीच रिलायन्सच्या हॉस्पिटलबाबत जनजागृती का केली गेली नाही ? असे लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना विचारलं आहे.
रिलायन्सचे हॉस्पिटल सुसज्ज असून त्यात सेंट्रल ऑक्सिजन युनिट व वेगळ्या खोल्या आहेत. तसेच 20 बेडचे आयसीयु असून काही व्हेंटिलेटर आहेत. शासकीय निर्देशानुसार कोव्हीड सेंटर तिथे आहे ना? मग याची जागरूकता नागरिकांत का नव्हती? इथल्या सोयी सुविधा का वापरल्या गेल्या नाहीत? निदान यापुढे त्याबाबत जागरूकता व्हावी व या हॉस्पिटलच्या क्षमतेचा वापर रुग्णासाठी केला जावा अशी मागणी जोशी यांनी केली आहे.
कर्जत मधील नागरिकांना अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे पनवेल, वाशी आवश्यक तिथे जावे लागत आहे व खाजगी रुग्णालयात अवाढव्य खर्च होतो असा समज पसरल्याने शासनाच्या आरोग्य विभागाने सकारात्मक संदेश समाजात द्यावेत व कोव्हीड वाबत शासनासह तज्ञांनी समाजात जनजागृती करावी व गैरसमज दूर करावेत. रुग्णांनी लक्षण दिसल्यावर आजार अंगावर काढत वेळ न घालवता वेळेत शासनाला कळवावे असे जोशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.







Be First to Comment