माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या सूचनेनुसार केली पाहणी 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे 🔷🔷🔶🔶
माथेरान जीवन प्राधिकरण मार्फत नेहमीच गढूळ पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने वारंवार याबाबत तक्रारी केल्या जात होत्या या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी म.जी.प्राधिकरण अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिल्यानुसार दि.१८ रोजी अधिकारी वर्गाने ( फिल्टर हाऊस ) जल शुद्धीकरण केंद्रावरील पाण्याच्या टाक्या ताबडतोब स्वच्छ करण्याचे कामगारांना आदेश दिल्यावर या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरपरिषदेचे गटनेते प्रसाद सावंत,माथेरान जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता किरण शानबाग, पी. एस.पाटील, बी.एस. माने, लिपिक जे. टी. दाभणे,मीटर चालक आकाश शेळके यांसह या कार्यालयाचे लाईन मॅन,संबंधित ठेकेदार आदी उपस्थित होते.
अनेकदा रस्त्यावर असणाऱ्या पाण्याच्या जोडण्या दुरुस्ती करताना संबंधित ठेकेदार हे रस्त्याचे क्ले पेव्हर ब्लॉक काढताना योग्य काळजी घेत नाहीत.कामे पूर्ण झाल्यावर तसेच रस्ते तात्पुरती मलमपट्टी करत असल्याने रस्त्यांचीअवस्था खूपच बिकट झाली आहे. दरवेळी ह्या रस्त्यांची डागडुजी करणे नगरपरिषदेच्या आवाक्याबाहेरचे असते यासाठी संबंधित ठेकेदाराने पाणी जोडणी अथवा काही दुरुस्ती करताना रस्त्यांची जी काही वाताहत होत आहे त्यासाठी ठराविक रक्कम नगरपरिषदेकडे जमा केल्याशिवाय हे
म.जी.प्राधिकरणचे ठेकेदार वठणीवर येणार नाहीत असे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केले.
इथे पाणी बिले वेळेत अदा केली जात असताना नागरिकांना पावसाळ्यात नेहमीच गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात असून बिलांची सुद्धा भरमसाठ आकारणी केली जात आहे. पावसाळ्यात पाण्याचा वापर सुध्दा कमी प्रमाणात नागरीक करीत आहेत.अनेकदा दिवसांआड सुध्दा पाणी पुरवठा केला जात आहे. याकामी प्रेरणा सावंत यांनी उपस्थित अधिकारी वर्गाच्या सर्व बाबी निदर्शनास आणून दिल्या.काही भागात पाणी जोडणी चे पाईप चॉकप झाल्याने त्या त्या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तो ताबडतोब सुरळीत चालू करून नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत असेही प्रेरणा सावंत यांनी सांगितले.
लवकरच सर्व प्रकारच्या समस्या निश्चितपणे मार्गी लावल्या जातील असे शाखा अभियंता किरण शानबाग यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक शकील पटेल यासंह नागरिक उपस्थित होते.







Be First to Comment