Press "Enter" to skip to content

मनसेच्या दणक्याने सेंट विल्फ्रेड काॅलेज नमले : विद्यार्थ्यांना न्याय

सिटी बेल लाइव्ह / रसायनी-राकेश खराडे 🔶🔷🔷🔶

मुंबई-पुणे जुन्या महामार्गांवरील शेडुंगजवल सेंट विल्फ्रेंड काॅलेज आहे.याठिकाणी रायगड,नवी मुंबई तसेच इतर परीसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.येथील काॅलेज व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन राहिले दूरच तर व्यवस्थापनाकडून अरेरावीची उत्तरे दिली जायची.

यामुळे विद्यार्थी वर्गांतही संतापाची लाट होती.यातच काॅलेजातील काही विद्यार्थ्यांना कामानिमित्त एनओसीची गरज असल्याने त्यांनी काॅलेज व्यवस्थापनाकडे मागणी केली होती.परंतु काॅलेज व्यवस्थापनाकडून कित्येक दिवस टालाटाल होत असल्याने विद्यार्थ्यांत नाराजीचा सूर होता.

अखेर काही काॅलेज युवक युवतींनी न्यायासाठी मनसेकडे मागणी केली होती.यावेली तत्काल मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेडुंग येथील सेंट विल्फ्रेड काॅलेज कार्यालयात दाखल झाले.
व त्यांनी विद्यार्थ्यांना एनओसी न देण्यामागचे कारण विचारले यावेळी काॅलेज व्यवस्थापन उत्तर देण्यास असमर्थ ठरला.अखेर मनसे स्टाईल पाहून विद्यार्थ्यांना त्वरीत एनओसी देण्यात आली.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी राजसाहेब ठाकरे व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.