Press "Enter" to skip to content

रवींद्र कदम व संदीप मालुसरे यांची कोविड योध्याची भूमिका


जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गावांना सॅनिटायझर, पीपीई कीट व अन्य उपयुक्त साहित्याची भेट 🔷🔶🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔶🔷🔷🔶

सुधागड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढत आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य गावातील नागरिकांसाठी मनसे सैनिक रवींद्र कदम व सामाजिक कार्यकर्ते संदीप मालुसरे यांनी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या अनेक प्रकारच्या साहित्याचे वाटप केले.

सामाजिक बांधिलकी जपत या दोन मित्रांनी समाजसेवेचे व्रत जोपासले. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. घार असे आकाशी, लक्ष मात्र पिल्यापाशी या उक्तीप्रमाणे नोकरी धंद्यानिमित्त शहरात वास्तव्यास असणारे रवींद्र कदम व संदीप मालुसरे या दोन मित्रांनी एकत्र येत कोरोनासारख्या जागतिक महामारीत आपल्या मायभूमीसाठी काही तरी योगदान दिले पाहिजे या संकल्पनेतून विविध प्रकारच्या व उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचे वाटप केले.

या साहित्यात 35 लिटर सॅनिटाईझर ( ज्यामध्ये 9 हजार लिटर पाणी समाविष्ट होईल, ) हाताला लावायचे 20 लिटर सॅनिटाईझर आणि छोट्या बॉटल 24 , डी डी टी पावडर 25 किलो 1 पी पी कीट संपूर्ण ड्रेस , 1 टेमप्रेजर मशीन,
हॅड ग्लोज आदी साहित्याचा समावेश आहे.

यावेळी जांभूळपाडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश शिंगाडे, महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे रविंद्र कदम , सामाजिक कार्यकर्ते संदीप मालुसरे , मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनिल साठे, राजेश लखिमले,कल्पेश धावडे , हरिश्चंद्र पाटील,रोहित दळवी,आणि इतर महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते.

जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील समाविष्ट असलेल्या असंख्य गावातील नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने रवींद्र कदम व संदीप मालुसरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले व आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.