सिटी बेल लाइव्ह / खोपोली (संतोषी म्हात्रे ) 🔶🔷🔶🔷
होनाड ग्रामपंचायतीवर शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आहे.शेकापक्षाचे उमेश देशमुख यांनी उपसरपंचपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवड होताच तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
खालापूर तालुक्यातील गर्भश्रीमंत म्हणून होनाड ग्रामपंचायत असून शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करीत थेट सरपंचपदी अपर्णा निकेश पाटील निवडून आल्या आहेत. दरवर्षी प्रत्येक सदस्याला विकासकामांची संधी मिळावी या उद्देशाने उपसरपंचपदी देण्याची प्रथा ठेवली आहे.
महेश देशमुख यांचा उपसरपंचपदाचा कालावधी संपल्यावर निवडणूक घेण्यात आली.दरम्यान सरपंच अपर्णा देशमुख यांच्या दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी -११.३० वा उमेश देशमुख यांच्या एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी रा.जि.प सदस्य नरेश पाटील, होनाड ग्रा.पं माजी सरपंच निकेश देशमुख, विद्यमान सदस्य प्रकाश पाटील,सागर पाटील,ग्रामस्थ रमेश पाटील,गणेश पाटील,अमोल देशमुख,साजगांव ग्रा.प.सरपंच अजित देशमुख, सदस्य अजित देशमुख, आत्करगांव ग्रा.पं.सदस्य समीर देशमुख यांच्यासह पंचक्रोशीतील पदाधिकारी उपस्थितीत राहून नवनिर्वाचित उपसरपंच देशमुख यांना शुभेच्छा दिल्या.
तर प्रशासकीय स्नेहल घोसाळकर यांनी काम पाहिली. होनाड ग्रामपंचायतीचा कारभार स्वच्छ असून दरवर्षी उपसरपंचपदावर सर्व सदस्यांना काम करण्याची संधी देत आहे याबद्दल रा.जि.प सदस्य नरेश पाटील यांनी कौतुक केले.रायगड जिल्ह्यात शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय मतभेद असतील मात्र होनाड ग्रामपंचायतीमधील दोन्ही पक्षाचे सदस्य एकदिलाने काम करीत असून जि.प.सदस्य हेच आमचे नेते आहेत अशी प्रतिक्रिया माजी सरपंच निकेशभाई देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.







Be First to Comment