Press "Enter" to skip to content

रसायनीत स्टेट बँकेच्यावतीने वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶

रसायनी येथील स्टेट बँकेच्यावतीने' झाडे लावा पर्यावरण वाचवा'चा संदेश देत परीसरात वृक्षलागवड करण्यात आली.यावेळी मोहोपाडा रसायनी येथील स्टेट बँके शाखेच्या आवारात तसेच इतर परीसरात विविध जातींच्या शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.

याप्रसंगी पर्यांवरण समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे महत्त्वाची असून ही वृक्षलागवड सिएसआर एक्झिक्युटिव्ह फंडातून होत असल्याचे स्टेट बँकेच्या रसायनी शाखेच्या मॅनेजर संगीता शर्मा यांनी सांगितले.वृक्षारोपणप्रसंगी स्टेट बँक आॅफ इंडियाचे जिल्हा चिफ मॅनेजर अरुण शंकर प्रसाद,असिस्टंट मॅनेजर कुमार परिमल प्रेम, सम्यक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाशशेठ गायकवाड यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया मॅनेजर जिल्हा समन्वयक प्रकाश तांबे, स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी ब्रांच मॅनेजर संगीत शर्मा यांच्या सह स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.