Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तहसिलदारांना निवेदन : सव्वा किलो कांदे भेट

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔷🔶🔷🔶

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली महिलां कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरोधात शुक्रवारी आंदोलन केले. यावेळी तहसिलदारना निवेदन देत सव्वा किलो कांदे देखील शासनासाठी  भेट दिली आहे.

  राष्ट्रवादी महिला काँग्रेस  खोपोली शहरच्या वतीने केंद्र सरकार, सकाळी अकरा वाजता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे केंद्र  सरकारच्या आडमुठी धोरणा विरोधात निषेध करण्यात आला. नगराध्यक्षा सुमन औसरमल,माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर,महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे,महिला सचिव जयश्री डोंगरे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

      खोपोली शहरात आंदोलनानंतर केंद्र सरकारच्या विरोधात निवेदन खालापूर  तहसीलदार इरेश चप्पलवार यांना देत सव्वा किलो कांदे भेट दिली.महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदे उत्पादन केले असतानाच केंद्र सरकाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे .आधीच कोरोनामुळे ङोळ्यात पाणी आले असताना  कांदा निर्यात बंदि करून रङविण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने  राष्ट्रवादी महिला काँग्रेस खोपोली शहराच्या वतीने आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली असल्याचे महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे यानी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.