तहसीलदारांना दिले निवेदन 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / पनवेल 🌟💠🌟💠
सध्या मोठ्या प्रमाणात कांदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लावलेला आहे. बिहार मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या केंद्र सरकाराने कांदा निर्यातबंदी केली. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सरकार नाही असे यातून स्पष्ट होते. या निर्यातबंदीचा निषेध व हि बंदी उठवावी याकरता पनवेल तहसिलदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवेदन दिले.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सौ. विद्या चव्हाण, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष दर्शन ठाकुर, प्रदेश सेवादलाचे उपाध्यक्ष प्रसाद पिंगळे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष विश्वजित मारवा, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सचिव संजय परब व सौ. सुरेखा चव्हाण उपस्थित होते.







Be First to Comment