Press "Enter" to skip to content

केंद्राने कांदा निर्यात बंदी उठवून शेतकरी वाचवावा !!


उरण राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन 🔷🔶🔷🔶


सिटी बेल लाइव्ह / उरण (अजित पाटील ) 🔶🔷🔷🔶

कोरोनाच्या काळात खऱ्या अर्थाने डॉक्टर, पोलीस आणि प्रशासन यांच्या सोबत सामान्य नागरीकांना जगविण्याचे काम आमच्या शेतकरी राजाने केले आहे. मात्र केंद्रात बसलेल्या मोदी सरकारने नुकतीच बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने देशोधडीला लावण्याचे पाप केले आहे. याचा निषेध म्हणून उरण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्फत निवेदन पाठवून ही कांदा निर्यात बंदी तातडीने उठवावी अशी मागणी केली आहे.

उरण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्षा सौ. भावनाताई घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज उरण तहसीलदारांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. राज्यातला शेतकरी खऱ्या अर्थाने वाचायचा असेल तर तुघलकी निर्णय पाठीमागे घेऊन सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शहराध्यक्षा संध्याताई घरत आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

केंद्र सरकारने नुकताच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास काढून घेतला आहे . उरणच्याच जेएनपीटी बंदरात निर्यात होऊ पाहणारा हजारो टन कांदा सुमारे 350 कंटेनरमध्ये पडून असून तो पुढील एक दोन दिवसात नासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यातून येणारी परदेशी गंगाजळी देखील अडकून पडलीे आहे . याचा सर्वाधिक फटका हा वर्षाचे बाराही महिने शेतात राबणाऱ्या शेतकरी बांधवाना बसणार आहे .

त्यातूनच नव्याने येणाऱ्या कांदा पिकाचे करायचे काय असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मध्यंतरी कांद्याचा तुटवडा भासला होता त्यावेळी सरकारने परदेशाातून कांदा आयात केला होता त्याचाही फटका शेतकरी बांधवाना बसला होता. आणि आता हा कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या उन्नत्तीच्या मार्गावरच सुरी फिरविली आहे. त्यातून अनेक कांदा निर्यातदार व्यापारी लोकांना ही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे .

या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर घातलेली बंदी विना अट त्वरित मागे घ्यावी अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे. तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी हे निवेदन स्वीकारून पुढे पाठविणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.