उच्चस्तरीय चौकशीची मागणी ! 🔷🔷🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / रोहा / समीर बामुगडे : 🔶🔷🔷🔶
शासनाच्या राखीव वनक्षेञावरील खैर जातीच्या वृक्षांची बेसुमार कत्तल होत असताना व वन जमिनींवर अतिक्रमण होत आसताना जे ह्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात आवाज उठवतात,त्यांचा पत्ता कट करण्यात खुद्द प्रशासनच आघाडीवर असत,हे वास्तव समोर आले आहे .
कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची ?.जंगलाच्या रक्षणाची जबाबदारी ज्याच्यावर आहे ते वरिष्ठ अधिकारीच या कारस्थानात आघडीवर आहेत याची शंका निर्माण होते ? कारण वन उपजावर अतिक्रमण करणारे धनदांडगे आहेत .अमाप पैशाने इथल्या व्यवस्थेची थोबाड बंद करण्याची त्याच्याकडे ताकद आहे .हाच फंडा वापरुन गेली अनेक वर्षे दक्षिण रायगड परिसरात येथील राखीव वनक्षेञामध्ये वृक्षतोडीचे अतिक्रमण झाले आहे.
हा तमाशा चालु असताना,बेकायदेशीर खैराची खुलेअाम तोड सुरू असुन अधिकारी फक्त बघ्याची भुमिका घेत आहे .इतकेच नाही तर बेकायदेशीर लाकुड वाहतुकीला सुध्दा प्रोत्साहन देत आहे कि काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत ,पैसा फेको तमाशा देखो, हे प्रकरण काय आहे याची उच्च स्तरिय चौकशी केली जावी अशा मागणीने जोर धरला आहे .
दक्षिण रायगडमध्ये मोठया प्रणाणात वरील सरकारी वनातील खैर जातीच्या झाडांची पावसाळयात चोरी करुन सदर माल हा महाड मधील चार मोठया खैर दलाल असणा-या मोठया धेंडांच्या घरी साठा करून ठेवाला जातो . राञी किवा सकाळच्या पहाटेच्या वेळेत रत्नागिरीच्या कात कंपनीत टाकतात . दक्षिण रायगड मधील पोलादपुर , माणगाव,आणि महाड विभागातील नाते, बिरवाडी परिसरातील या मोठया खैर चोरांची पूर्ण माहिती असूनही वनविभाग त्यांना का पकडू शकत नाही,त्यांच्या घरी चोरीचा खैर माल साठा करण्यास वनखात्याच्या वनपरिक्षेञ अधिकारी प्रशांत शिदे,यांचा वरदहस्त आहे का ? याची आपण चौकशी करावी अन्यथा सदर या चोरीच्या व्यवसायात अनेक अधिकारी गुंतलेले आहेत अशी र-थानिक नागरिकांत कुजबुज आहे .तरी महाड मधील ह्या खैर काटे वाल्यांचा लवकरात लवकर बदोबस्त करावा आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या वनअधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी प्रतिक्रया नारायण खुळे यांनी दिली आहे.







Be First to Comment