मनसेची झलक,पालीतील बँक ऑफ इंडिया शाखेने केले मराठीत फलक 🔶🔷🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत) 🔷🔶🔷🔶
सुधागड तालुक्यातील बँक ऑफ इंडिया पाली शाखेतील माहिती फलक हे पूर्वी फक्त हिंदी व इंग्रजी भाषेत होते. त्यामुळे मराठी भाषेत देखील हे माहिती फलक असावे अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांनी मागील महिन्यात बँक व्यवस्थापकांकडे केली होती. या मागणीला यश आले असून आता बँकेतील फलक मराठीत करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सैनिक हा मराठी अस्मितेसाठी नेहमीच तत्पर असल्याचे दिसतो. महाराष्ट्रात मराठीच व मराठी बोला चळवळ यासाठी मनसे सतत आग्रही राहिली आहे. सुधागड तालुक्यात मनसेची झलक कामी आली असून बँक ऑफ इंडिया पाली शाखेत मराठी भाषेत फलक लावण्यात आले. शिवाय आणखी एक नवीन मोठा व दिसेल असा मराठीतील फलक लावणार असल्याचे बँक व्यवस्थापक राजेंद्रप्रसाद गुप्ता यांनी सुनील साठे यांना सांगितले.
सुधागड तालुक्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात हिंदी व इंग्रजी भाषेत फलक असतील तर त्याठिकाणी मराठी माणसाला नियम व सूचना सहज समजाव्यात यासाठी मराठी भाषेत देखील फलक असावेत अशी मागणी मनसेने लावून धरली आहे. त्यामुळे मनसेची धडक आता कोणत्या कार्यालयावर असेल याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.






Be First to Comment